तारुण्य,सत्ता,अधिकार सांभाळता आला पाहिजे !

Table of Contents

भागवतात नारदांना सनदकुमारांनी महाराज सगर आणि त्यांच्या वंशजांची कथा सांगितलेला भाग आला आहे.सुर्यकुळात जन्मलेल्या बाहु नावाच्या राजाने पृथ्वीवर अतिशय उत्तम राज्य केले. जनतेला सुखी करणे हेच त्याचे जीवन होते.असं म्हणतात की त्याच्या राज्यात शेतीत मशागत न करताही भरपूर पिक येई.पाऊसही वेळेवर पडायचा.पुढे कालांतराने बाहुस अहंकार झाला.माझ्यासारखा श्रेष्ठ राजा या विश्वात दुसरा नाही.
अहंकाराबरोबर मत्सर आणि आसक्ती येतेच.मग विनाश अटळ असतो.तारुण्य,धन,सत्ता, अधिकार या गोष्टी त्या माणसाचं अधःपतन घडवून आणतात. बाहूच्या बाबतीत तेच घडले. मत्सरी व लोभी स्वभावामुळे शरीरस्वास्थ्य नाहिसे होते बाहुबाबतीतही हेच झाले.त्याचे आरोग्य बिघडायला सुरुवात झाली.
मत्सरी स्वभावाच्या माणसास संपत्तीची साथ लाभली तर तो आगीबाणच होतो, भंगार वागणुकीने आणि गर्वाच्या,तुच्छ शब्दांमुळे जवळची माणसेही आपली वाटत नाही. त्याच्या मनात परस्रीचा भोग घेण्याची इच्छा होते मग त्या इच्छाच त्याचा सर्वनाश घडविते.सज्जनहो बाहुचा विनाश आपण ऐकलात. यातली प्रत्येक गोष्ट आपणास लागु आहे.
तुकोबाराय म्हणतात,
पराविया नारी माऊली समान।
मानिलिया धन काय वेचे।।
पराविया नारी रुखुमाई समान।
पराविया नारी आणि परधना।
नको देऊ मनावरी येऊ।।
अशा कितीतरी प्रमाणांद्वारे स्रीसन्मान कसा करावा याचे मार्गदर्शन संतांनी केले आहे. मात्र त्याचे पालन या कलियुगात होताना दिसत नाही हे अगदी खरे आहे. पण याची सुरुवात आम्ही आमच्यापासून केली तर बरचसं जग बदलेल.मी जगाबद्दल बोलत नाही.स्वतःचं जग सुंदर करण्याबद्दल बोलतोय.
स्वात्मचिंतन आम्हाला नक्कीच यावर विचार करायला भाग पाडील.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/3IDvxCy

Leave a Comment

error: Content is protected !!