
शिरूर : शासनाची अब्जावधी रुपयांची फसवणूक व लुट तहसीलदारांनी केली आहे,भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे आम्ही दिले आहेत. त्यामुळे नुसत्या बदलीवर भागणार नसून संबधित शिरूरच्या तहसीलदारांचे निलंबन व्हावे या मागणीसाठी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी दिली.
तहसिलदारांनी वाळूच्या गाड्यांचे ब्रास कमी करणे, वाळू ऐवजी क्रॅश सॅण्ड दाखवणे, वाळूच्या गाडया आर्थिक तडजोड करून पळवून लावणे. याबाबत लेखी तक्रार आपण स्वतः वरिष्ठांकडे केल्यानंतर वरीष्ठांनी चौकशी करून त्यामध्ये तहसिलदार दोषी आढळून आल्या आहेत. यानंतर त्यांची तात्काळ बदली करण्यात आली. मात्र त्यामुळे आमचे समाधान झाले नसून तहसिलदारांची तात्काळ निलंबन व्हावे अशी आमची आग्रही मागणी आहे. त्यासाठी आम्ही उच्च न्यायाचे दरवाजे ठोठावणार आहोत, असे सांगून श्री. भोरडे म्हणाले, “गोरगरीबांना जाणूनबुजून त्रास देण्याचे काम या तहसिलदारांनी केले आहे.
तहसील कार्यालयातील कुठलेही काम आर्थिक देवाण-घेवाणी शिवाय होत नव्हते. नागरिकांची आर्थिक पिळवणूक मोठ्या प्रमाणावर होत होती. तसेच आर्थिक संगनमत करून अनेक वाळूच्या गाड्या सोडून देण्यात आल्या होत्या.त्यामध्ये मोठा गैरव्यवहार करण्यात आला.
वेळोवेळी याबाबतीत आम्ही आवाज उठविला. थेट मंत्रालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला. तेंव्हा कुठे आता बदली करण्यात आली आहे. मात्र आम्ही त्यावर समाधानी नाही. त्यांचे निलंबन व्हावे या मागणीवर आम्ही ठाम आहोत प्रसंगी आम्ही उच्च न्यायालयातही जाऊ असे श्री. भोरडे यांनी सांगितले.
from https://ift.tt/3EtTgTb