
मुंबई : राज्यातील कोरोना रूग्ण संख्येत रोजच वाढ होत चालली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी होऊ न देणे हा उपाय आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालपासून निर्बंध लागू केले आहेत. मात्र, बार आणि दारूच्या दुकानांवर गर्दी होत असेल तर ते ही बंद करावी लागतील, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
सध्या राज्यात रोज 40 हजारांपेक्षा अधिक रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ज्या ठिकाणी गर्दी होईल येथे निर्बंध लावले जातील. राज्यात रविवारीपासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे या निर्बंधाचे नागरिकांनी पालन करावे असेही आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.
सध्या राज्यातील ऑक्सिजनची मागणी 270 मेट्रिक टनावरुन 350 मेट्रिक टन इतकी झाली आहे. मात्र, हे कोव्हिड आणि नॉन-कोव्हिड रुग्णांसाठी लागणाऱ्या एकूण ऑक्सिजनचे प्रमाण आहे. यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण दिवसाला लागणाऱ्या 1700 ते 1800 मेट्रिक टनची मागणी पूर्ण केली आहे. सध्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना कमी प्रमाणात ऑक्सिजनची गरज लागत आहे. त्यावरुन सध्याचा कोरोना विषाणू सौम्य वाटत असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
from https://ift.tt/3tddbD8