चहा आणि कॉफी म्हणजे अनेकांचे जीव की प्राण. यासाठी ना त्यांना वेळेचे बंधन असते ना पैशाचे. संधी भेटली की, हे लोक तयारच असतात. मात्र आज आम्ही तुम्ही अशा कॉफीबद्दल सांगणार आहोत. ज्याची किंमत ऐकून तुम्ही हैराण व्हाल एवढं नक्की…         
आपण ज्या कॉफीबद्दल बोलत आहोत ती कॉफी जापानच्या ओसाका शहरात असणाऱ्या कॉफी हाऊसमध्ये मिळते. विशेष म्हणजे ही कॉफी 22 वर्ष जुनी आहे. त्यामुळे या कॉफीच्या एका कपाची किंमत तब्बल 65 हजार रूपये आहे. ही कॉफी जगातील सर्वात जुनी आणि महागडी असल्याचे बोलले जात आहे.
मंच हाऊस हा जगातील असा एकमेव कॅफे आहे ज्या ठिकाणी दोन दशकांपेक्षा अधिक जुनी कॉफी ताजी करून दिली जाते. कॅफेचे मालक तनाका यांच्याकडून एकदा कॉफीचे काही पॅकेट्स फ्रिजमध्ये तसेच राहिले. ही पॉकिट जवळपास दीड वर्ष फ्रिजमध्ये तशीच होती. जेव्हा तनाका यांना ही पॉकिट दिसली, त्यावेळी त्यांनी ती फेकून देण्याऐवजी त्याची कॉफी बनवली. त्यांना जुन्या कॉफीचा स्वाद कसा लागतो? हे पाहायचे होते.
जेव्हा तनाका यांनी दीड वर्ष जुनी कॉफीनी बनवली तेव्हा त्या कॉफीचा स्वाद पाहून त्यांना आश्चर्य वाटले. कारण ती तेव्हाही पिण्या योग्य होती. तेव्हा त्यांना ठरवले की, कॉफी अनेकवर्ष स्टोअरमध्ये बंद करून ग्राहकांना एका वेगळ्या प्रकारची कॉफी द्यायची.
तनाका यांनी एक दशक कॉफीला लाकडाच्या छोट्या-छोट्या बॅरलमध्ये साठवले. दरम्यान तनाका यांनी 20 वर्ष कॉफी साठवली. तेव्हा त्या कॉफीचा स्वाद अल्कोहल असल्याने ग्राहकांना ती खूपच आवडली. सध्या तनाका कॉफी बारीक करून कापडाच्या चाळणीत टाकतात. त्यानंतर त्यावर गरम पाणी टाकत असल्याने कॉफीचा कडूपणा निघून जातो. दरम्यान त्यातून निघणारे द्रव्य लाकडाच्या बॅरलमध्ये साठवले जातात. 2 दशकानंतर बॅरलला असलेल्या नळांद्वारे कॉफी काढली जाते.

from https://ift.tt/3qW6AtK

By News

Leave a Reply

Your email address will not be published.