उस्मानाबाद : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्याचे पहायला मिळत आहे. तसेच कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओम्रिक्रॉनने देखील राज्यात शिरकाव केला आहे. रुग्ण संख्या वाढतच राहिली तर पुढील काळात लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो असा इशारा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिला आहे. त्या तुळजापूरमध्ये देवीचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या, दर्शनानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी लॉकडाऊनचा इशारा दिला आहे.
देशासह राज्यावर कोरोनाचे संकट आहे. पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता देशात आणि राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने शिरकाव केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढल्यास कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात येऊ शकते असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
तसेच जर एखाद्या मंदिर परिसरामध्ये मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत असतीलत, तर ते मंदिर चालू ठेवायचे की बंद याचा निर्णय मंदिर प्रशासन घेऊ शकते असे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, तसेच नवीन वर्ष देखील जवळ आले आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्याप्रमाणात पार्ट्या आयोजित करण्यात येताता. या पार्ट्यांना गर्दी होत असते. यातून कोरोना प्रादुर्भावाचा धोका असल्याने या पार्श्वभूमीवर राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री 9 ते पहाटे 6 या वेळेत जमावबंदी असून, याकाळात पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच नववर्षाच्या स्वागत पार्ट्यांवर देखील बंदी घालण्यात आली आहे.

from https://ift.tt/33ZTe8e

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *