
आज दत्त जयंती. कारण आजच्याच दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला. यानिमित्त दत्तगुरूंबद्दल जाणून घेऊयात…
अत्रि ऋषी व त्यांची पत्नी अनसूया यांच्या पोटी जन्माला आलेले रत्न म्हणजे दत्त देवता, असा उल्लेख पुराणांमध्ये आहे. एकच मानवी शरीराला 3 तोंडे अशी दत्तमूर्तीची रचना आहे. या त्रिमूर्तीमध्ये एक दत्ताची तर, दुसऱ्या दोन्हीपैकी एक दुर्वास व दुसरा सोम अशा दोन्ही भावांचाही समावेश असल्याचा पुराणांमध्ये उल्लेख आहे. दत्ताचा उल्लेख त्याचे साधक, परंपरेने गुरुदेव असा केला आहे.
दत्तमुर्तीच्या विशिष्ट रचनेबद्धल अनेकांना कुतूहल वाटते. हिंदू पौराणिक साहित्याचा आधार घेतल्यास, दत्त, सोम व दुर्वास या तिघांची एकत्र मूर्ती म्हणजे विष्णू, ब्रह्मा व शिव यांचा अवतार होय. पूर्व काळात विष्णू म्हणून प्रचलित असलेले दत्त उत्तर काळात ब्रह्मा, विष्णु व महेश अशा तिन्ही देवांचे अंशरूप आहे.
त्रिमुख दत्त देवता प्रामुख्याने औदुंबरा(उंबर)च्या झाडाखाली यज्ञकुंडासमोर वा अग्नीसमोर बसलेली दिसते. गळ्यात रुद्राक्षमाळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर 4 कुत्री, मागे गाय असा परिसर दिसतो. ही 4 कुत्री हे वेद व शंकराचे भैरव मानले जातात.
from https://ift.tt/3p5muCl