तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांची ‘दिल्ली पॅटर्न’ अभ्यासगटाच्या सदस्यपदी निवड !

Table of Contents

पारनेर: तालुक्यातील राष्ट्रपती पुरस्कार विजेते तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांची दिल्ली पॅटर्न राज्य अभ्यासगटात सदस्य म्हणून निवड झाली आहे.या समिती बरोबरच संदीप गुंड हे भारत सरकारच्या ऑपरेशन डिजिटल बोर्ड या समितीचे सदस्य आहेत तसेच आय.आय.एम अहमदाबादच्या ग्रास रूट इनोव्हेशन कोर टीमचे सदस्य म्हणून काम पाहात आहेत.
दि.17 डिसेंबर 2021 रोजी दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये झालेल्या आमूलाग्र बदलांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गटाच्या स्थापनेबाबत राज्य मंत्रिमंडळाने शासन निर्णय पारित केला. दिल्ली सरकारच्या दिल्ली निगम अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेत झालेले बदल, विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान, विद्यार्थी व शिक्षकांसाठी असणाऱ्या सुविधा, विद्यार्थ्यांचे संस्कार व शिस्त शिक्षकांच्या शिकविण्याची कार्यपध्दती आदी गोष्टींचा सखोल अभ्यास करण्याकरिता तज्ञ मंडळीचा अभ्यासगट राज्य शासनाने नेमला आहे.
या अभ्यासगटामध्ये शिक्षण क्षेत्रातील कांही तज्ञ मंडळींचा समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यामध्ये आपल्या पारनेर तालुक्यातील राष्ट्रपती पुरस्कार विजेते तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या अभ्यास गटाचे पथकप्रमुख म्हणून औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.
दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने झालेल्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी खास डिजिटल गुरुजी संदीप गुंड यांची निवड करण्यात आली आहे. नुकतेच कागल येथे या अभ्यास गटाचे पहिले चर्चासत्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व कोल्हापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. सदर चर्चासत्रात दिल्ली पॅटर्नमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर संदीप गुंड यांनी सादरीकरण केले.
या समिती बरोबरच संदीप गुंड हे भारत सरकारच्या ऑपरेशन डिजिटल बोर्ड या समितीचे सदस्य आहेत तसेच आय.आय.एम अहमदाबादच्या ग्रास रूट इनोव्हेशन कोर टीमचे सदस्य म्हणून काम पाहात आहेत.
दिल्ली सरकाराच्या दिल्ली निगम अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये झालेल्या सर्व शैक्षणिक व भौतिक बदलांचे गुणात्मक व संख्यात्मक विश्लेषण या अभ्यासगटाकडून केला जाणार आहे.व त्याबाबतचा अहवाल शासनास दोन महिन्याच्या आत सादर करणार आहे.

from https://ift.tt/9KqbkzG

Leave a Comment

error: Content is protected !!