नाशिक : आपली जबाबदारी पार पडताना सुप्त गुणांनाही प्रोत्साहन देऊन आपल्या विचारांचे आंदण सर्वसामान्यांना पुस्तक रूपाने पोहोचवणे हे मोठे समाजकार्य असून यासाठी लागणारा वेळ कामाच्या व्यस्ततेतून काढण्याचे कौशल्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार माजी खासदार नानासाहेब नवले यांनी काढले.
पोलीस उपमहासंचालक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या रानजुई व शोध या पुस्तकाच्या सहाव्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर निर्मला नवले, डॉ. विद्युलता शेखर पाटील, पोलीस आयुक्त दीपक पांडे, विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, आ. माणिक कोकाटे, आ. नितीन पवार, बालसाहित्यिक संजय वाघ, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, सुनील कडासने,जान्हवी नवले, सुमेश नवले, आदित्य शेखर पाटील आदी उपस्थित होते.
शोध या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचा 2013 सालात कवी कालिदास कलामंदिर येथे प्रकाशन सोहळा झाला होता. त्याच शोध या पुस्तकाच्या सहाव्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा यावेळी पार पडल्याचा आनंद डॉ. शेखर पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी पराग बेडसे यांनी डॉ. शेखर पाटील यांचा मानचिन्ह देऊन सत्कार केला तर नंदुरबार येथील पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी डॉ. शेखर पाटील यांचे स्केच त्यांना भेट दिले.

from https://ift.tt/fdPS9KG

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *