ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व कसे असते? त्या व्यक्तींनी स्वभावात काय बदल करायला हवा? यासह इतर अनेक महत्वपूर्ण बाबी समजून घेऊयात… 
● या व्यक्तींना वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास असतो.
● हे लोक फार आळशी असतात.
● या लोकांना दुसऱ्यांकडून यांच्या ढीगभर अपेक्षा असतात.
● कुटुंबियांकडून यांना नेहमी तक्रारीचा सूर ऐकावा लागतो.

● या महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांत जन्मलेले आळशी, हट्टी आणि गर्विष्ठ असतात, तर शेवटच्या 15 दिवसांत जन्मलेले अतिशय सृजनशील आणि हौशी कलाकारअसतात.
● हे लोक कल्पनाविश्वात रमलेले असतात.
● दुसऱ्याला कमी समजणे ही मेख त्यांच्या ठायी असते.
● या लोकांचे व्यक्तिमत्त्व समोरच्यावर छाप पाडणारे असते.
● या लोकांमध्ये तरुणपणात पाय घसरण्याची दाट शक्यता असते.
● या महिन्यात जन्मलेल्या मुली चालाख असतात. त्या गोड बोलून समोरच्याकडून आपले काम काढून घेतात.
● या मुलींचा स्वभाव काहीसा अबोल असतो. त्यामुळे त्यांच्या मनात काय सुरू आहे? याची कल्पना येत नाही.

‘या’ व्यक्तींनी स्वभावात काय बदल करायला हवा? :
● ज्योतिषशास्त्रानुसार या व्यक्तींनी दैनंदिन सवयींमध्ये सुधारणा करायला हवी.
● या लोकांनी समोरच्याला मान दिला तर आपोआप त्यांनाही मान मिळेल.
● पैशांचे व्यवहार जपून केले पाहिजे.
● कुटुंबाबद्दल आपले प्रेम योग्य प्रकारे व्यक्त केले पाहिजे.
● आपल्या भीतीवर मात करून आत्मविश्वासाने आपल्या करिअरमध्ये पाऊल टाकले पाहिजे.
● या लोकांकडे नेतृत्वाचे गुण असतात. फक्त त्यासाठी संवादकौशल्य विकसित केले पाहिजे.
या महिन्यात जन्मलेल्या आदर्श व्यक्ती : रतन टाटा, अटल बिहारी वाजपेयी, धिरूभाई अंबानी, शरद पवार, धमेंद्र, मोहम्मद रफी, सोनिया गांधी, युवराज सिंग, उदित नारायण, अरुण जेटली आदी.

from https://ift.tt/3xMWcHY

By News

Leave a Reply

Your email address will not be published.