मुंबई : सिनेसृष्टीमध्ये सध्या विकी कौशल – कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर – आलिया भट्ट हे कलाकार आणि त्यांच्या लग्नाच्या वृत्तांना उधाण आलेले दिसत आहे. अशात या यादीमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडेचे नाव देखील सामील झाले आहे. अंकिताने लग्नाविषयी तिच्या मनातील भावना सर्वांना सांगितली आहे. त्यामुळे आता ती केव्हा लग्न करणार असे प्रश्न चाहते तिला विचारत आहेत.
अंकिताने नुकतीच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. गेल्या अनेक दिवसांपासून ती बॉयफ्रेंड विक्की जैन बरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. त्यामुळे तिथे तिला लग्नाविषयी तिचे मत विचारण्यात आले होते. तेव्हा ती उत्तर देत म्हणाली की, “लग्न आणि प्रेम या दोन्ही तत्वांवर माझा विश्वास आहे. लग्नाबद्दल माझ्या मनात नेहमीच उत्सुकता आहे, कारण यामध्ये दोन व्यक्ती एकत्र राहून पुढे संसार चालवणार असतात.”
पुढे भारतीय संस्कृतीचा उल्लेख करत ती म्हणाली की, “लग्न हे फक्त एका मुलाचे आणि एका मुलीचे होत नाही, तर यामध्ये दोन कुटुंब जोडली जातात. भारतीय संस्कृतीमध्ये असेच आहे. मला हे फार आवडते आणि जर मला त्याची संधी मिळाली तर नक्कीच मी तसे करेल.”
अंकिताला ती डिसेंबरमध्ये लग्न करणार आहे का? असा प्रश्न एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. तेव्हा तिने सरळ उत्तर न देता सांगितले की, “एक ना एक दिवस मी लग्न करणारच आहे. मला पत्नी होण्याची आणि संसार सुरू करण्याची खूप आवड आहे.” तिने दिलेल्या या उत्तरामुळे ती डिसेंबर १२, १३ किंवा १४ या तारखांमध्येच सात फेरे घेताना दिसेल. अशी चर्चा सुरू आहे. मात्र यावर अद्याप तिने स्पष्ट कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
अनेक वृत्तांमध्ये असे देखील सांगितले आहे की, अंकिता बॉलिवूड कलाकारांप्रमाणे डेस्टिनेशन लग्न करणे टाळणार आहे. ती लग्नासाठी मुंबईमधीलच एक पंचतारांकित हॉटेलच्या शोधत आहे.

from Parner Darshan https://ift.tt/3qDiYAB

By News

Leave a Reply

Your email address will not be published.