
टाकळी ढोकेश्वर : चार्टर्ड अकाउंट (सी.ए.) या परीक्षेचा सन 2022 निकाल आज जाहीर झाला असुन त्यात पारनेर तालुक्यातुन टाकळीढोकेश्वर येथील कु. प्रगती अशोक गागरे ही चार्टर्ड अकाउंट परिक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे.
कु.प्रगतीचे प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण टाकळी ढोकेश्वर येथे झाले. यानंतर तिने उच्च माध्यमिक शिक्षणासाठी पुण्यात प्रवेश घेतला. चार्टर्ड अकाउंटंट होण्याचे तिचे स्वप्न होते आणि पहिल्याच प्रयत्नात तिने ते स्वप्न पूर्ण केले. यावर्षी सीएची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणारी कु. प्रगती ही तालुक्यातील एकमेव विद्यार्थीनी आहे.
प्राथमिक शिक्षक अशोक गंगाराम गागरे व शिक्षिका सौ. मोहिनी अशोक गागरे यांची ती कन्या असून भाळवणी ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन संतोष गंगाराम भनगडे यांची ती भाची आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
from https://ift.tt/NnCodm4