जीन्सच्या पॉकेटवर लहान बटणे कशामुळे असतात?

Table of Contents

तुम्ही कधी जीन्स विकत घेताना जीन्सच्या पॉकेटवर असलेल्या धातूच्या छोट्या-छोट्या बटनांचा विचार केलाय का? ही बटणे का लावली असतील? उत्तर माहित नाही ना. चला, तर आज त्याबाबत जाणून घेऊयात…
जीन्सच्या पॉकेटवर लावण्यात धातूची बटने डिझाईन किंवा स्टाईल म्हणून लावण्यात आलेली नाही. तर यामागे एक इतिहासात दडलाय. पूर्वी पाश्चिमात्य देशातील कामगार जीन्स घालात. त्यांना कठिण परिश्रम करावे लागत असल्याने जीन्सच्या पॉकेटचे फाटणे सर्वसामान्य बाब बनली होती. मात्र कामगारांसाठी पॉकेट अनेक दृष्टीने महत्वाचे होते.
मग या समस्येवर मात करण्यासाठी. एका टेलरने अनोखी शक्कल लढवली. ही कल्पना जॅकब डेविसला सुचली आणि त्याने समस्येवर सोपा उपाय शोधला. 1873 मध्ये जीन्सच्या डिझाईनमध्ये त्याने केलेला बदल आजही कायम आहे.
जीन्सच्या पॉकेटच्या बॉर्डरवर जॅकबने धातूचे बटन लावले. जीन्सचे पॉकेट यामुळे ताणले जात होते आणि पॉकेट फाटण्यापासून वाचत होते. पुढे त्याला ही आयडिया पेटंट करायची होती. मात्र पैसे नसल्याने तसे करणे शक्य नव्हते. नंतर त्याने Levi Strauss ला 1872 मध्ये पत्र लिहून आपली आयडिया विकत घेण्याचा प्रस्ताव दिला. त्याने त्यात एक अट ठेवली आणि ती अट म्हणजे आपल्या आयडियाच्या बदल्यात Levi Strauss याने जॅकबला पेटेंट करण्यासाठी पैसे द्यावे.

from Parner Darshan https://ift.tt/3mMMTUz

Leave a Comment

error: Content is protected !!