जलजीवन मिशनच्या १७ कोटींच्या कामांना प्रशासकिय मान्यता !

Table of Contents

पारनेर : जलजीवन मिशन योजनेच्या तालुक्यातील १६ कोटी ६७ लाख ८४ हजार रूपये खर्चाच्या १४ पाणी योजनांना तांत्रीक मान्यता मिळाल्यानंतर आता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यखेतेखाली दि. १५ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत प्रशासकिय मंजुरी देण्यात आल्याची माहीती आमदार निलेश लंके यांनी दिली.
जिल्हाधिकारी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर, जिल्हा आरोग्य  अधिकारी डॉ. संदीप सांगळे, कार्यकारी अभियंता (जिवन प्राधिकरण) ए.ए.मुळे, भुजलसर्वेक्षण वरीष्ठ वैज्ञानिक रश्मी कदम, उममुख्यकार्यकारी अधिकारी  तथा पाणी स्वच्छता मिशन संदीप कोहीनकर, कार्यकारी अभियंता (ग्रामिण पाणीपुरवठा जि. प. नगर) आनंद रूपनर हे उपस्थित होते.
पारनेर तालुक्यातील पोखरी १ कोटी ६७ लाख ८१ हजार,  वारणवाडी १ कोटी ३२ लाख ५ हजार,  कळस १ कोटी १५ लाख ६२ हजार, नांदूरपठार ९७ लाख ७३ हजार, वाडेगव्हाण १ कोटी ६६ लाख, कर्जुलेहर्या १ कोटी १७ लाख ४२ हजार, पिंप्रीगवळी ६० लाख ९ हजार, टाकळीढोकेेश्‍वर १ कोटी ९९ लाख ६८ हजार, वडगांवसावताळ १ कोटी ९० लाख ५६ हजार, रांजणगांवमशिद ३५ लाख १३ हजार, पळशी १ कोटी ९२ लाख १६ हजार, नारायणगव्हाण १ कोटी १७ लाख ४५ हजार, पाडळीदर्या ५४ लाख ७३ हजार, भोंद्रे २१ लाख ७३ हजार.
पाणीयोजनांसाठी आमदार निलेश लंके यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विविध गावांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना धन्यवाद दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस भाऊसाहेब महाराज कोकाटे, भाऊसाहेब चौधरी, पोखरीचे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब शिंदे, नामदेव करंजेकर, कर्जुलेहर्याचे ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेेब शिर्के, टाकळीढोकेश्‍वरच्या सरपंच अरूणा खिलारी, वडगांव सावताळचे ग्रामपंचायत सदस्य संजय रोकडे, माजी सरपंच संजय शिंदे, रांजणगांवमशिदच्या राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा धाडगे, ग्रामपंचायत सदस्य संग्राम इकडे, बाळासाहेब इकडे, पळशीचे सरपंच गणेश मधे, उपसरपंच अप्पा शिंदे, वाडेगव्हाणचे सरपंच बाळासाहेब सोनवणे, नारायणगव्हाणचे सरपंच निखिल जाधव, उपसरपंच  राजेश  शेळके, भोंद्रेचे सरपंच विशाल झावरे यांनी अभिनंदन केले.

from https://ift.tt/OBz8EQL

Leave a Comment

error: Content is protected !!