
आपलीकडे मत देण्यापूर्वी बोटाला शाई लावली जाते. मात्र तुम्ही कधी असा विचार केलाय का? जर एखाद्या मतदाराला बोटंच नसतील तर शाई कुठे लावत असतील? माहिती नसेल तर आज त्याचे तुम्हाला उत्तर मिळेल…
निवडणुकीला मतदान करणाऱ्या लोकांसाठी त्यांच्यासाठी वडणूक आयोगाची नियमावली आहे. दरम्यान मत देणाऱ्या व्यक्तीच्या उजव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते. एक ब्रशने नखावर पहिल्या गाठीपर्यंत शाई ओढली जाते. यामुळे संबंधित व्यक्तीने मत दिल्याची माहिती मिळते. जर एखाद्या व्यक्तीने ही शाई पुसण्याचा प्रयत्न केला तरी ती पुसली जात नाही. विशेष म्हणजे ही शाई कित्येक दिवस निघत नाही.
अशात जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या हाताची तर्जनी नसेल तर उजव्या हाताच्या इतर बोटांपैकी एका बोटाला ही शाई लावली जाते. जर एखाद्याच्या उजव्या हाताला बोटंच नसतील तर डाव्या हाताच्या बोटाला शाई लावली जाते. मात्र दोन्ही हातांमध्ये बोटं नसल्यास दोन्ही हातांच्या कोणत्याही भागावर शाई लावता येते. त्याच वेळी, जर एखाद्या व्यक्तीला दोन्ही हात नसेल तर, पायाच्या बोटावर निवडणुकीची शाई लावली जाते.
from https://ift.tt/bVYvkTD