जगातील सर्वात मोठा बटाटा? 

Table of Contents

इंटरनेटवर एक मोठ्या बटाट्याचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. एवढा मोठा बटाटा असू शकतो. हे पाहून काही लोक आश्चर्यचकित झाले आहेत. हा बटाटा न्यूझीलंडमधील हॅमिल्टनजवळील बटाट्याच्या मळ्यात सापडला आहे. 
याचे वजन ७.९ किलो एवढे आहे. यामुळे हा बटाटा जगातील सर्वात मोठा बटाटा असल्याची चर्चा जोर धरत आहे. जेव्हा हा बटाटा पाहिला तेव्हा कॉलिन आणि डोना क्रेग-ब्राऊन नावाच्या जोडप्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’साठी अर्जही केला आहे.

कॉलिन म्हणाला कि, ‘आम्ही मळ्यात खोदत असताना आम्हाला हा मोठा बटाटा सापडला. सुरुवातीला विश्वास बसला नाही की तो बटाटा आहे, पण नंतर तो खणून काढल्यावर बटाटा असल्याचे निष्पन्न झाले. या मोठ्या बटाट्यामुळे हे जोडपे चांगलेच प्रसिद्ध झाले आहेत. दोघांनीही या बटाट्याला ‘डग’ असे नाव दिले आहे.

याअगोदर सर्वात वजनदार बटाट्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ब्रिटनमध्ये झाला आहे. २०११ मध्ये पाच किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या बटाट्यासाठीचा हा रेकॉर्ड आहे. कॉलिन जोडप्याचे म्हणणे आहे की त्यांनी ‘डग’ची नोंद करण्यासाठी ‘गिनीज’ मध्ये अर्ज केला आहे. मात्र अद्याप संदर्भात कोणताही अभिप्राय मिळालेला नाही.

from Parner Darshan https://ift.tt/3BNrOgU

Leave a Comment

error: Content is protected !!