
जगातील सर्वात महागडी गोष्ट कुठली, असा प्रश्न जर विचारला गेला, तर प्रत्येकजण त्याचं वेगवेगळं उत्तर देईल. मात्र जगात सर्वात महाग काय? याचा नुकताच खुलासा करण्यात आला असून त्याचं उत्तर स्पेस स्टेशन असं आहे.
स्पेस स्टेशन सर्वात महाग जगातील सर्वात महागडी वस्तू आहे. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनची किंमत ही 150 बिलियन डॉलर (15 हजार कोटी डॉलर) एवढी आहे. हा आकडा रुपयांत मोजायला झाला, तर ही रक्कम कॅलक्युलेटरच्या एका स्क्रीनमध्ये मावणं शक्यच नाही.
म्हणून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन हीच जगातील सर्वाधिक महागडी गोष्ट असल्याचं दिसून आलं आहे. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनसाठी अनेक देशांनी फंडिंग केलं आहे. या स्टेशनच्या देखभालीसाठीच नासाला दरवर्षी 400 कोटी रुपये एवढा खर्च येतो.
स्पेश स्टेशन सेटअप करणं इतकं अवघड होतं की कुठल्याही एका देशाला ही बाब परवडणारी नाही. त्यामुळेच यासाठी अनेक देशांनी पुढाकार घेतला आणि स्पेश स्टेशनची निर्मिती झाली. नोव्हेंबर 2000 पासून सुरू झालेल्या या स्पेस स्टेशनमध्ये अनेक देशांचे शास्त्रज्ञ येतात आणि विविध ग्रहांचा अभ्यास करू शकतात. या स्पेस स्टेशनवर मिरचीचं पिक घेण्याचा प्रयोग काही शास्त्रज्ञांनी यशस्वी केला होता. या मिरचीची एक रेसिपी देखील बनवण्यात आली होती.
from Parner Darshan https://ift.tt/3CW6E1A