
विविध कारणास्तव आपल्याला अनेकदा जखम होते. यानंतर आपण लगेच हळद लावतो. कारण हळद जंतूनाशक असल्याने रक्तस्रावही थांबण्यास मदत होते. मात्र हळदीशिवायदेखील अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही छोट्या जखमेवर लावू शकता. त्याबाबत जाणून घेऊयात…
● मध : हे इन्फेक्शनला कारणीभूत ठरणाऱ्या बॅक्टेरियाला मारतं आणि वेदनांपासूनही आराम गेतं. संशोधनात सिद्ध झालं आहे की इतर स्किन अँटिबायोटिक्सपेक्षा मध खूप परिणामकारक आहे. मात्र मध शुद्ध असावं.
● लसूण : लसूण ठेचल्यानंतर त्यातून एक चिकट द्रव बाहेर येतो. तो लसणीतील अँटिबॅक्टेरिअल घटक आहे. त्यामुळे छोटी जखम झाल्यास त्यावर लसणीच्या पाकळ्या ठेचून लावा. २० मिनिटांनंतर ते पाण्यानं धुवावं. यापेक्षा जास्त वेळ लसूण जखमेवर ठेवू नये अन्यथा त्वचेच्या टिश्यूंना हानी पोहोचू शकते.
● बटाटा : बटाटा किसून एका कपड्यात गुंडाळा. हा कपडा जखमेभोवती बांधा. प्रत्येक ४ तासांनी बटाट्याचा किस आणि कपडा बदला. रात्रभरदेखील तुम्ही असं बांधून ठेवलं तर जखम लवकर बरी होण्यास मदत होईल.
● कोरफड : याच्या गरात अँटिसेप्टीक घटक असतात, त्यामुळे इन्फेक्शन होत नाही. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन ई असतं, जे त्वचेची जखम लवकर बरी करण्यास मदत करतं. कोरफडीचा गर थेट जखमेवर लावा. दर २ तासांनी ही प्रक्रिया करा.
5) खोबरेल तेल : खोबरेल तेला अँटिबॅक्टेरिअल घटक असतात. खोबरेल तेल थेट जखमेवर लावावं त्यामुळे बॅक्टेरिया आणि इन्फेक्शन वाढत नाही. तसंच जखमेचे व्रणही राहत नाही. जखम बरी झाल्यानंतर त्यावर नियमित खोबरेल तेल लावल्यास व्रण दूर होतात.
from Parner Darshan https://ift.tt/3kbvGSV