
दुःख हद्दपार करण्याची क्षमता या कोशात आहे. लंकेला जाण्यासाठी समुद्र पार करावा लागत होता.सर्व वानरं चिंतातुर अवस्थेत बसलेली होती.हा समुद्र कसा पार करायचा?हा प्रश्न कुणालाही सुटेना.शेवटी हनुमंताला त्याच्या शक्तीची जाणीव करुन देण्यात आली आणि मग हनुमंताने तोफोड्डान केले.
सज्जनहो आमचा विज्ञानमय कोश हा ज्ञानाने परिपूर्ण आणि समृद्ध आहे. पण गुळ मातीत पडावा आणि तो मातीचाच खडा वाटावा इतके मायेत आम्ही वेष्टिलो गेलो आहोत.मुळ स्वरुपाचा संस्कार बाहेर काढायला आम्हालाच झटावे लागणार आहे. शरिरावरचा मळ आम्ही आंघोळ करताना काढतो तशी ही कृती आहे. आम्ही समाजात वावरत असताना आपल्या कर्मातुन विशिष्ट धारणा तयार होतात.मी मास्तर,मी इंजिनिअर,मी उद्योजक, मी महाराज, मी समाजसुधारक, मी नेता,मी शेठ अशा अनेक उपाध्या कर्माने प्राप्त होतात.त्या उपाध्या टिकवण्यासाठी ठराविक चौकट आपोआप तयार होते.त्यानुसार वागणं क्रमप्राप्त होतं.
मी अमुक आहे मग हे मला शोभणारे नाही ही धारणा मनोमयकोशाची आहे. पण विज्ञानमय कोशात त्यावर सारासार विचार होतो.योग्य अयोग्य तपासण्याची व्यवस्था या कोशात आहे. पण लक्षात ठेवा,अनेकदा उपाध्या दुःखाचं कारण बनतात.तुम्ही लोकाभिमुख झालात की मग स्वतःची मतं,इच्छा गाठोड्यात बांधून ठेवाव्या लागतात.कुणीही मदत मागायला आलं तर मनस्थिती असो अगर नसो मदत करावीच लागते.मदत दोन पद्धतीने करावी लागते.एक अंतकरणात दयाभाव आहे आणि दुसरं म्हणजे प्रतिमा जपण्यासाठी.
मी कर्ता आहे ही भावनाच सगळ्या गोष्टी करवुन घेते.त्यामुळे दुःख भोगावच लागतं.सर्व कर्माचं कर्तेपण टाकण्याची हिम्मत याच कोशाच्या चिंतनाने मिळते.कारण सत,असत भाष्य इथंच होणार आहे. मन मनमानी कारभार करीलही,पण विषेश ज्ञानाची प्राप्ती त्याला ताळ्यावर आणण्याचं काम करील.या कोशात बुद्धी समाविष्ट असल्याने निर्बुद्धपणा रहाण्याचे कारण नाही. बौद्धिक पारायणं इथं झडलीच पाहिजे.
रामकृष्णहरी
from https://ift.tt/BLtckF0