पारनेर : नगर जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या दैठणे गुंजाळ येथील ग्रामदैवत खंडेश्वर महाराजांच्या वार्षिक यात्रोत्सवाची सांगता चित्तवेधक कुस्त्यांनी झाली. 
दरवर्षी माघ पौर्णिमेला या उत्सवाचे आयोजन करण्यात येते.यात्रोत्सवानिमित्त कुस्त्याच्या आखाडा भरविण्यात येतो.कोरोनाच्या परिस्थितीमुळे गेल्या दोन वर्षापासून हगामा भरविण्यात आला नव्हता. यंदाच्या ग्रामीण भागातील यात्रोत्सवामधील पहिलाच हगामा असल्याने महाराष्ट्रासह परराज्यातून आलेल्या नामवंत मल्लांनी आखाड्यासाठी हजेरी लावली.अनेक चित्तवेधक कुस्त्यांनी प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. आखाडाबहादूर स्व.सहादू गुंजाळ यांच्या प्रतिमेचे व आखाड्याचे पूजन पद्मश्री पोपटराव पवार,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विकास रोहोकले,माजी जि.प.सदस्य अरूण होळकर,नानासाहेब डोंगरे,युवराज पठारे,महाराष्ट्र केसरी अशोक शिर्के,रंगनाथ रोहोकले यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी ७५ हजार रूपयांची मानाची कुस्ती ऋषी लांडे व केवल भिंगारे यांची तर दुसरी ५१ हजार रूपये ईनामाची कुस्ती अप्पा कर्डीले व अक्षय पवार यांच्यात झाली.पारनेर केसरी अनिल गुंजाळ,मोहन गुंजाळ,डॉ.संतोष भुजबळ आदींनी पंच म्हणून काम पाहिले.यावेळी जुन्या पिढीतील मल्लांचा सत्कार करण्यात आला.डॉ.संतोष गुंजाळ व जयसिंग गुंजाळ यांनी समालोचन केले.
यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी सरपंच बंटी गुंजाळ,सबाजी येवले,साहेबा गुंजाळ,सुनील गुंजाळ,भाऊसाहेब येवले,शिवराम जासूद,दत्ता घोलप,मोहन गुंजाळ,शिवाजी लावंड,अशोक केदार आदींसह ग्रामस्थ व यात्रा समितीने प्रयत्न केले.

from https://ift.tt/S6oYtcJ

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *