चार देहांबरोबर सुक्ष्म पंचमहाभुते जाणुन घ्या !

Table of Contents

कालच्या भागात आपण देह आणि देहाचे चार प्रकार समजून घेतले.आज आपण पंचमहाभुतं हवा,अग्नी, पाणी पृथ्वी आणि आकाश या पलिकडे असणारी सुक्ष्म पंचमहाभुते जाणुन घेणार आहोत.कारण आपल्याला मुख्य विषयाकडे म्हणजे पंचकोशाकडे जाण्यासाठी हे माहीत असणे गरजेचे आहे. आपण प्रत्याहाराविषयीही मागच्या भागात बोललो आहे.त्याचाही पुढे संबंध येणार आहे.
सूक्ष्म पंचमहाभूते : तमोगुण प्रधान असणारी विक्षेप शक्ती असणाऱ्या आणि अज्ञानाचा आरोप झालेल्या चैतन्यापासून प्रथम आकाश उत्पन्न होते. नंतर आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी अशा क्रमाने ही सूक्ष्म पंचमहाभूते उत्पन्न होतात. या आकाशादी सूक्ष्म महाभूतांच्या ठिकाणी सत्व, रज, तम हे गुण असतात. या सूक्ष्म महाभूतांनाच ‘तन्मात्रा’ असे म्हणतात. यांच्यापासून सूक्ष्म शरीरे आणि स्थूल पंचमहाभूते निर्माण होतात.कोणत्याही कार्यकारण भावाशी तन्मात्रा निगडीत असतात.सत्वभाव निर्माण झाल्याने त्या गुणाचा विकास केल्याने त्याचा अनुभव घेता येतो.(तन्मात्रा विवरण खूप विस्तीर्ण आहे. त्यावर विस्तृत बोलणे सध्या गरजेचे नाही. पुढे त्यावर आपण बोलणारच आहोत.)
आता आपण पंचकोश विवरणाकडे वळुया.
पंचकोश : शरीर धारण केलेला प्रत्येक जीव पंचकोशांनी युक्त असतो. ते पाच कोश म्हणजे अन्नमय,प्राणमय,मनोमय,विज्ञानमय आणि आनंदमयकोष असे आहेत.आपण क्रमाक्रमाने एक एक कोश समजुन घेणार आहोत.आपल्या जीवनावर त्याचा काय प्रभाव पडतो?हे समजले की जगायचं कसं हे कळणार आहे. आपण नवीन वाहन खरेदी केले की विनाकारण चौकात चकरा मारतो,विनाकारण दौरे आयोजित करतो.काही काळ लोटला की मग हे प्रकार बंद होतात.मग कामाशिवाय वाहन वापरीत नाही पण वाहनाच्या विनाकारण वापराने झालेली झिज वाहन जीर्ण करते. मग वेळोवेळी काम करुन घेण्याशिवाय गत्यंतर नसते.अन्यथा प्रवासात वहानाचा खोळंबा झाल्याचा अनुभव कधीतरी आपण घेतला असेलच.
शरीराचेही कार्य असेच आहे. हे अदभूत यान आहे. प्राणिक शक्ती आणि वायुंचा समतोल राखण्यासाठी अन्न हे इंधनाचे काम करते.शरिराला वाह्यात कामात जुंपुन त्या वाहनासारखी गत बहुतांश व्यक्तींची होते.ज्ञान मिळते पण ते आमलात आणण्यासाठी शरीर जीर्ण झाल्याने सारं मृतवत होऊन जातं.म्हणून पंचकोशाकडे खूप गांभीर्याने आपण पहावं चिंतन करावं हे अपेक्षित आहे.पुढील भागात आपण अन्नमयकोशावर बोलु.
रामकृष्णहरी.

from https://ift.tt/87aiFnt

Leave a Comment

error: Content is protected !!