शीर्षक वाचून वाटले असेल हा नक्की काय प्रकार आहे. तर त्याचे असे आहे की, डेन्मार्कने त्यांच्या देशातील तुरुंगात कैद्यांची संख्या वाढल्याने तुरुंग भाड्याने घेण्यासाठी कोसोवी बरोबर करार केलाय. त्यानुसार या तुरुंगातील जवळपास 300 कोठड्या 5 वर्षांसाठी भाड्याने घेतल्या जाणार आहे. त्यापोटी दरवर्षी (15 दशलक्ष युरो) 1,28,17,20,000 रुपये भाडे म्हणून दिले जाणार आहेत.
एका माहितीनुसार डेन्मार्क या तुरुंगात निर्वासित कैदी पाठविणार आहे. या तुरुंगात डेन्मार्कचे कायदे लागू असतील. कोसोवो तुरुंगात सध्या 700 ते 800 बराकी रिकाम्या असून त्यातील 300 डेन्मार्क भाड्याने घेत आहे. 2023 पासून कोसोवो राजधानी प्रीस्तीनापासून 50० किमी दूर असलेल्या गाझीलन तुरुंगातील बराकी पुढील 10 वर्षे भाड्याने देणार आहे. त्यातून ते 210 दशलक्ष युरोची कमाई करतील.
डेन्मार्कच्या न्यायमंत्र्यांच्या माहितीनुसार देशातील तुरुंग आणि तुरुंग अधिकारी यांच्यावरील बोजा या निर्णयामुळे कमी होईल. तडीपारीची शिक्षा झालेल्या निर्वासित नागरिकांना डेन्मार्क तुमची भविष्यातील जागा नसल्याचा संकेत यातून दिला जातोय. तुरुंग भाड्याने घेण्याची ही कल्पना नवीन नाही.यापूर्वी नॉर्वे, बेल्जियम देशांनी नेदरलंड मधील तुरुंग भाड्याने घेतले होते.

from https://ift.tt/3mvNk58

By News

Leave a Reply

Your email address will not be published.