
पारनेर :आमदार निलेश लंके यांनी काल (सोमवारी) पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना बाधित विदयार्थी व जवाहर नवोदय विद्यालयात भेट दिली. पालकांनी व विद्यार्थीनी घाबरून जाऊ नये, काळजी करू नये. उपचारासाठी दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची काळजी घेतली जाईल, सर्वोतम उपचार केले जातील. जोपर्यंत विद्यार्थी कोरोनामुक्त होणार नाहीत, तोपर्यंत मी या विद्यार्थ्यांचा पालक आहे व या सर्व बाधित रुग्णांचा सर्व लागणारा खर्च निलेश लंके प्रतिष्ठान संस्थे मार्फत मोफत केला जाईल असे यावेळी आमदार निलेश लंके यांनी आश्वासन दिले.
टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयात 26 डिसेंबरला तब्बल 31 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. तर 27 डिसेंबरला पुन्हा एकदा याच जवाहर नवोदय विद्यालयातील आणखी 20 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
या विद्यालयातील बाधितांचा आकडा आता 70 वर गेला आहे.अजून आकडा वाढण्याची शक्यता असून, आमदार निलेश लंके यांनी प्रशासनाला व आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
from https://ift.tt/3pwUXtW