से म्हटले जाते की, तुम्ही फोनमध्ये जे काही करताय? त्यावर थेट गुगल लक्ष ठेवते आणि आपली सर्व माहिती सर्व्हरवर स्टोअर करते. दरम्यान गुगलजवळ तुमची किती माहिती स्टोअर आहे? ते तुम्ही सहजपणे तपासू शकता. 
याबाबत जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम गुगल अकाउंट सेक्शनमध्ये जा. जर तुम्ही डेस्कटॉपवर असाल तर वरच्या उजव्या बाजूला तुम्हाला अकाउंटचा फोटो दिसेल. जर तुम्ही एखादी इमेज ठेवली असेल तर ती तुम्हाला दिसेल.
गुगल अकाउंटच्या फोटोवर क्लिक करताच मॅनेज युवर अकाउंटचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा, त्यानंतर एक नवीन पेज दिसेल, ज्यामध्ये डावीकडून तिसऱ्या क्रमांकावर डेटा अ‍ॅण्ड प्रायव्हसीचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
यानंतर संपूर्ण पेज तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये तुम्ही कधी काय केले आहे? काय-काय सर्च केले? हे पाहता येईल. येथे तुम्हाला फक्त जीमेलच नाही तर गुगल मॅपची टाईमलाईन, यूट्यूब वॉच आणि सर्च हिस्ट्रीही दिसेल.
याशिवाय, माय गुगल अ‍ॅक्टिव्हिटी अंतर्गत, तुम्ही गुगलवर कधी आणि काय शोधले? हे देखील समजेल. दरम्यान तुमच्याकडे ते बंद करण्याचा ऑप्शन असून काही सेटिंगद्वारे तुम्ही ते बंद करू शकता.

from https://ift.tt/HL3fZJT

By News

Leave a Reply

Your email address will not be published.