दैनंदिन जीवन जगताना अनेक माणसं छोट्या छोट्या गोष्टींवरून क्रोधीत होतात.पटकन रागावतात.लगेच राग अनावर होतो.असं जीवन जगणारी व्यक्ती म्हणजे चालती फिरती कचरा गाडी.ती घंटागाडी सर्व कचरा उचलून नेते आणि कचरा डेपोत खाली करते.कचरा खाली केला की गाडी रिकामी होते.क्रोधाचा गोळा केलेला कचरा खाली केला नाही तर काय होतं माहिती आहे का?
आपण कचरा डब्यात कचरा गोळा करतो.मग त्यात खरकटं,खराब झालेल्या भाज्या, भात बरच काही असतं.जर ती घंटागाडीच आली नाही तर तो साठलेला कचरा आपला प्रताप दाखवतो.तो सडतो,दुर्गंधी सुटते,त्यात किडे तयार होतात हे आपण प्रत्येकाने अनुभवलं असेल.मग कधी एकदा हा कचरा फेकून देतो असं होतं.पण मनात साठलेला क्रोधाचा,इर्षेचा,घमेंडीचा कचरा बाहेर फेकावा वाटत नाही. कारण आम्ही त्यावर कधी चिंतनच करीत नाही.डुकरं घाणीचं साम्राज्यच पसंत करतात.आमचं मनही त्याहुन कमी नाही. क्रोध करणं त्यातही मनगटात रग असेल तर विचारुच नका.ते अत्यंत सोपं आहे.पण क्षमाशील होणं म्हणजे मोठा पुरुषार्थ आहे.
क्षमा करण्याची सवय लावुन घेतली तर सुंदर जीवनाची सुरुवात झालीच म्हणून समजा.क्षमा करायला शिकणं म्हणजे डरपोक होणं नव्हे.आपण असा प्रयत्न केला असता आपलाच कुणी कधी म्हटला असेल,त्यानं तुला शिव्या दिल्या आणि तु तर काहीच म्हणाला नाही?तु काय हातात बांगड्या भरल्या होत्या का?एवढ्या एका वाक्यानं आमच्यातला राक्षस जागा होतो.जरा विचार करा.क्षमा करण्याचा एखादा प्रयोग तुमचं अवघं जीवन बदलुन टाकील.
आपकी अपनी ऑनलाइन दुकान खोलना अब हो गया है बहुत ही आसान और सस्ता भी। 

सिर्फ़ ४९९ रुपए में आप अपने ख़्वाबोंको हक़ीक़त में बदल सकते हैं।

आज ही www.apptmart.com पे रेजिस्टर कीजिये और एक क़दम सफलता की ओर उठायिये।

अधिक जानकारी के लिए आज ही सम्पर्क करें +91 70286 32421
तुका म्हणे राहे अंतर शीतळ।शांतीचे ते बळ क्षमा अंगी।।/ बळहिन मनुष्याकडे शांती दया असुच शकत नाही. त्यासाठी उच्च विचारांचं मानसिक बळ आवश्यक आहे. हा दैवी गुण आहे.त्यामुळेच तुकोबाराय म्हणतात,तुका म्हणे क्षमा सुखाचि हे राशी। सांडुनि का ऐशी दुःखी व्हावे।। जो सुखाच्या शोधात आहे त्याने क्षमा नावाचा दागिना परिधान केला पाहिजे. हे सोपं नाही पण प्रयत्नसाध्य आहे. मी या वाटेवरचा पांथस्थ आहे. थोडं जरी जमलं तरी आनंद आभाळभर आहे.
रामकृष्णहरी

from Parner Darshan https://ift.tt/3BIXmEK

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *