पारनेर : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत आणि राज्यस्तरीय ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रावर गुरुवारी (दि. ९) भव्य चंपाषष्ठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री क्षेत्र कोरठण खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार, शुद्ध चंपाषष्ठी दिनांक ५/१२/१९९७ रोजी प. पु. स्वामी गगनगिरी महाराज यांचे हस्ते, सुवर्ण कलशावरोहनाने, ३ लाखावर भाविकांचे उपस्थितीत संपन्न झाला होता. यावर्षी ४२ व्या वर्षाचा भव्य चंपाषष्ठी महोत्सव कोरठण गडावर साजरा होत आहे.
चंपाषष्ठीला श्री खंडोबाचा मार्तंड भैरव अवतार प्रगट झाला व मनीमल्ल दैत्याचा संहार केला व सर्व देवदेवतांना वरदान लाभले म्हणून चंपाषष्ठी महोत्सवाचे महात्म्य आहे. कुलधर्म, कुलाचार, तळी भांडार करण्याची खंडोबा भक्तांची प्रथा आहे. या चंपाषष्टी पर्वणीत दिवसभरात लाखावर खंडोबा भाविक , उपस्थित राहतील असा अंदाज धरून, देवस्थान तर्फे सर्व नियोजन चालू आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने चंपाषष्टी उत्सवात येथील श्री खंडोबा म्हाळसा घोड्यावरील भव्य पितळी मूर्ती मंदिराचा ६ वा वर्धापन दिन, आणि प. पु. स्वामी गगनगिरी महाराज मूर्ती, ध्यानमंदिराचा पाचवा वर्धापन दिन सोहळा संपन्न होईल.
चंपाषष्ठी महोत्सव दि. ९ डिसेंबर रोजी पहाटे ४ वा. श्री खंडोबा मंगल स्नान, उत्सव मूर्तीचे सिंहासनावर अनावरण, साज शृंगार पूजा व आरती सकाळी ६वा. श्री खंडोबा अभिषेक पूजा, आरती, सकाळी ७ ते ९ वा. होमहवन यज्ञ सकाळी ८ ते १० वा शरद भागवत प्रस्तुत आनंद यात्री भक्ती भजन मंडळ, आळेफाटा यांचे संगीत भजन, गोरेगाव ग्रामस्थांचा दिंडी सोहळा, पिंपळगाव रोठा ते खंडोबा देवस्थान, सकाळी ११ वा. पासून महाप्रसाद वाटप सुरू होईल. सकाळी ११ वा. ह. भ. प. गजानन महाराज काळे ( श्री मल्हारी महात्म्य खंडोबा कथाकार ) यांचे सुश्राव्य हरिकीर्तन. दुपारी १ वा. चांदीच्या पालखीतून शाही रथात चांदीच्या उत्सव मूर्तीची भव्य शोभा मिरवणुकीने मंदिर व कोरठण गड प्रदक्षिणा, दुपारी १ वा. नानाजीभाई ठक्कर ठाणावाला यांचे हस्ते देणगीदारांचा सन्मान. पालखीचे व्यासपीठावर आगमन, मान्यवरांच्या उपस्थितीत चंपाषष्टी महोत्सवाची महाआरती होईल.
दुपारी १ वा. वाजल्यापासून श्री खंडोबा गाणी स्पर्धा, शाहीर स्वप्निल गायकवाड आणि पार्टी, संतोष, मालन जाधव आणि बालगायक कलाकार लालेश जागरण पार्टी यांचा सामना चंपाषष्ठी महोत्सवा निमित्ताने होईल वाहनस्थळ खंडोबा फाटा आणि मंदिरच्या पूर्व बाजूला सोय आहे. दि. ९ डिसेंबरला खंडोबा फाटा ते मंदिर हा १ किमी रस्ता वाहतुकीस दोन्हीही बाजूने बंद राहील. चंपाषष्ठीला पारनेर पोलीस, अहमदनगर पोलीस मित्र संस्था यांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. जय मल्हार विद्यालयाचे विद्यार्थी, अळकुटी महाविद्यालयाचे विद्यार्थी, क्रांती शुगर कारखाना सुरक्षा पथक स्वयंसेवक म्हणून सेवा करणार आहेत. देवस्थानतर्फे पिण्याचे पाणी, दर्शन व्यवस्था, वाहने पार्किंग इत्यादी बाबींचे नियोजन करण्यात आलेले आहे.
या महोत्सवात उपस्थित राहून भाविकांनी कूलदैवत स्वयंभू श्री खंडोबा, चंपाषष्ठी महाप्रसाद आणि श्री खंडोबा म्हाळसा घोड्यावरील भव्य पितळी मूर्ती मंदिर, ब्रम्हलीन प. पु. स्वामी गगनगिरी महाराज मूर्ती ध्यान मंदिर, शाहीरथ पालखी सोहळा यांचे दर्शनाचा लाभ घ्यावा असे निवेदन देवस्थानतर्फे अध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, सरचिटणीस महेंद्र नरड, खजिनदार हनुमंत सुपेकर, चिटणीस मनीषा जगदाळे, विश्वस्त अश्विनी थोरात, किसन मुंढे, बन्सी ढोमे, अमर गुंजाळ, देवीदास क्षीरसागर, सर्व माजी विश्वस्त, ग्रामस्थ व मुंबईकर कोरठण पंचक्रोशी यांनी केले आहे.

from https://ift.tt/3dsGYOZ

By News

Leave a Reply

Your email address will not be published.