पारनेर : शहरातील कुंभारवाडी येथील प्रगतशील शेतकरी शिवाजी चंदू औटी यांचे अल्पशा आजाराने दि. १ फेब्रुवारी २०२२ रोजी दु : खद निधन झाले. निधना वेळी त्यांचे वय ७२ वर्षांचे होते. अत्यंत गरिबीत मोलमजूरी करून एकत्रीत कटूंबाचा सांभाळ केला. शिक्षणाचे महत्त्व समजल्यामुळे ते स्वतः अशिक्षित असून त्यांनी आपल्या भावंडांना व मुलांना चांगले शिक्षण दिले. कष्टाळू , प्रामाणिक स्वभावाच्या जोरावर त्यांनी शेती व्यवसायात चांगल्या प्रकारे यश मिळविले. 
शेतामध्ये त्यांनी बंधू धोंडीभाऊ औटी यांच्या मार्गदर्शनाने टोमॅटो, तूर, हरभरा, पपई, आंबा, चिक्कू,शतावरी, काकडी, कलिंगड, कांदा, लसूण, कोबी, प्लॉवर, वांगे या सारख्या पिकांचे भरघोस उत्पन्न मिळविले. पारनेर परिसरात सर्वप्रथम वाटाणा या कमी दिवसात येणाऱ्या पिकाचा शोध लावला. त्यांचे पाहून पारनेर व कान्हूरपठार परिसरातील लोकांनी वाटाणा या पिकाचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतले. त्यांनी आपला शेतीमाल पुणे, मुंबई, नगर, नाशिक, सुरत, नागपूर, सोलापूर येथील बाजारपेठेत पाठविला. त्या मालाला मोठया प्रमाणात मागणी वाढली. त्यांनी आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करून उत्पन्न वाढविले. त्यांनी आपले नातेवाईक व परिसरातील लोकांना शेतीचे नवनवीन प्रयोग करून उत्पन्न वाढविण्यास चालना दिली.
सुरुवातीला ते मजूरीच्या निमित्ताने नगर शहरातील जगताप मळा व नेप्ती येथे अनेक वर्ष कुटूंबासह वास्तव्यास होते. तेथे त्यांनी शेतमजूर व बांधकाम मजूर म्हणून प्रामाणिक काम केले. तेथे त्यांनी मोठा मित्रपरिवार जमवला. आजही त्यांना नालेगाव व नेप्ती परिसरात ” महाराज ” या नावाने संबोधले जाते.विहीरी खोदण्यात त्यांचा मोठा हातखंडा होता. नगर व पारनेर परिसरात त्यांनी अनेक विहीरी खोदल्या. स्वतःच्या शेतात जवळ जवळ ९ विहीरी व ३५ बोअरवेल त्यांनी घेतले.
पंढरपूरच्या विठ्ठलाची त्यांनी सलग १० वर्ष सपत्नीक पायी वारी केली. भजन व कीर्तन ऐकण्याची त्यांना आवड होती. पारनेर सेवा संस्थेचे माजी चेअरमन व सामाजिक कार्यकर्ते आनंदा औटी व प्रा. शिक्षक समितीचे अध्यक्ष तथा छत्रपती संभाजीराजे ग्रामीण पतसंस्थेचे संस्थापक ,चेअरमन संभाजी औटी सरांचे ते वडील होते. पारनेर नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वैशाली औटी यांचे ते सासरे होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते धोंडीभाऊ औटी वायरमन यांचे ते भाऊ होते.

from https://ift.tt/X7RSJ2q

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *