
पहिल्यांदा संगणक चालवताना कीबोर्डवरील अक्षरे बराच वेळ लागला असेल. तेव्हा असे वाटले असेल कि, कीबोर्ड बनवणारा किती मुर्ख आहे? एका ओळीत सर्व अक्षरे का नाही ठेवली. कारण अशाने टायपिंग करणे अजून सोपे गेले असते. मात्र कीबोर्डची अक्षरे उलटे सूलटे असणे ही चूक नसून अनेक वर्षांच्या चिंतनाचे फळ आहे. त्याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…
कीबोर्डचा विचित्र इतिहास पाहिला कि, आपल्याला कीबोर्डच्या उलट-सूलट अक्षरांचे गणित लक्षात येईल. पाहायला गेले तर कीबोर्डचा इतिहास टाईपरायटरशी संबंधित आहे. संगणक किंवा कीबोर्ड येण्यापूर्वीच QWERTY फॉरमॅट सुरु आहे. 1868 मध्ये, टाईपरायटरचा शोध लावणाऱ्या क्रिस्टोफर लॅथम शोल्सने प्रथम ABCDE… फॉरमॅटवर कीबोर्ड बनवला. मात्र यामुळे त्याला अपेक्षित गतीने टायपिंग होत नसल्याचे दिसून आले. यासोबतच की बाबत इतरही अनेक समस्या समोर जाणवल्या.
एबीसीडी असलेल्या कीबोर्डमुळे बटणे एकमेकांच्या इतकी जवळ होती की, टायपिंग करणे कठीण होते. याशिवाय, इंग्रजीमध्ये काही अक्षरे आहेत जी जास्त वापरली जातात (जसे की E, I, S, M) आणि काही शब्द क्वचितच आवश्यक आहेत (जसे की Z, X, इ.). या सर्व प्रकरणात, अधिक वारंवार वापरल्या जाणार्या अक्षरांसाठी, कीबोर्डवर बोट हलवावे लागले आणि टाईपिंग स्लो झाले. त्यामुळे अनेक प्रयोगांनंतर 1870 मध्ये QWERTY स्वरूप फायनल झाले.
प्रयोगांच्या दरम्यान आणखी एक स्वरूप Dvorak मॉडेल समोर आले. हे मॉडेल त्याच्या कीमुळे प्रसिद्ध झाले नाही, परंतु त्याचे शोधक August Dvorak यांच्या नावावरून ते ठेवले गेले. मात्र, हा कीबोर्ड फार काळ चर्चेत राहिला नाही. कारण ते अक्षरानुसार नव्हते, सोपेही नव्हते. दरम्यान लोकांना QWERTY मॉडेल सर्वाधिक आवडले, त्यामुळे ते अतिशय लोकप्रिय झाले.
from Parner Darshan https://ift.tt/3CXQPYo