फलटण : महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या वाईनच्या निर्णयावरुन महिला नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या किर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता असून पोलीस बंडातात्या कराडकर यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी त्यांच्या मठावर दाखल झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.बंडातात्या यांच्या फलटणच्या पिंपरद येथील मठावर पोलीस दाखल झाले आहेत. बंडातात्या कराडकर यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे.
बंडातात्या यांच्या फलटण येथील मठावर आज सकाळी पोलीस दाखल झाले आहेत. पोलिसांनी बंडातात्यांसोबत चर्चा केली. पोलीस बंडातात्यांना दारु आणि महिला नेत्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी ताब्यात घेणार असल्याची चर्चा आहे.

▪बंडातात्यांनी माफी मागितली.
 दरम्यान राष्ट्रवादीकडून बंडातात्या गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते होती. गुन्हा दाखल झाला नाही, तर न्यायालयात खटला दाखल करण्याचा इशारा राष्ट्रवादीकडून देण्यात आला होता. बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली होती. त्याशिवाय बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात बेकायदेशीर आंदोलनप्रकरणी सातारा शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यसनमुक्ती संघटनेचे ‘दंडवत आणि दंडूका’ आंदोलन साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी राज्यातील सर्वच नेत्यांची मुले ही दारु पितात, असे सांगताना बंडातात्या कराडकर यांनी आरोप केला होता. या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला होता.

from https://ift.tt/itWwJAq

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *