कामक्रोध भावना ताब्यात ठेवण्यासाठी काय कराल?

Table of Contents

कामक्रोधावर सहजगत्या नियंत्रण मिळवता येत नाही. ते तापदायक आहेत हे समजले की मग त्याच्या निरसनासाठी आपोआप मन प्रयत्न करु लागतं.या विकाराने अनेक जपीतपी भ्रष्ट झाले. अनेकांचा आयुष्यभर कमावलेला लौकिक कामक्रोधाने धुळीस मिळवलेला आपण पहातो. 
नाथ महाराज एकनाथी भागवतात म्हणतात ब्रम्हदेवाला देखील कामक्रोधावर विजय मिळवण्यासाठी तप करावे. लागले.कामक्रोधनिरसनार्थ ब्रह्मदेवानें तप आरंभिलें
मनुष्याचा जो जाणिजे मास । तो देवांचा एक दिवस । ऐसी संख्या सहस्त्रवरुष । तपसायास करी ब्रह्मा ॥१५॥
ऐसी सहस्त्ररुषेंवरी । ब्रह्मया कमलासनी तप करी । त्याच्या तपाची थोरी । व्यासमुनीश्वरीं वर्णिली ॥१६॥
मनुष्याचा एक महिना म्हणजे ब्रम्ह देवाचा एक दिवस अशी सहस्र वर्षे तप केले.त्यांच्या तपाची थोरवी व्यासमुनींनी वर्णन केली आहे.

हे आदिकल्षींची जुनाट कथा । होय श्रीव्यासचि वक्ता । तेणें आणोनियां वेदार्था । यथार्थ वार्ता निरुपिली ॥१७॥
तीच श्रीशुकें परीक्षिती । निरुपिली कृपामूर्ती । या विंरिचीचीं तपप्राप्ती । उत्कृष्ट स्थिती अवधारा ॥१८॥
तपः प्रभावानें ब्रह्मदेव अंतर्ब्राह्य बदलला
ब्रह्मा कमलासनीं तप करी । नवल त्याचे धारिष्टाची थोरी । नानाइंद्रियविकारी । परी झाला अविकारी निजनिष्ठ ॥१९॥
शमदमांचेनी निजमेळें । जिंतिले मनपवनांचे उल्लळे । इंद्रियांचें अपार पाळे । तेणें तपोबळें आक्रमिले ॥२०॥
मन अमन पाहों आदरिलें । तंव तें चंचलत्व विसरलें । चित्त विषयचिंते मुकलें । चित्ती विषयचिंते मुकलें । चित्तीं चिंतलें चैतन्य पैं ॥२१॥
श्री व्यासांनी ग्रंथीत केलेली ही कथा श्रीशुकांनी राजा परिक्षितीस सांगितली त्याने तो चिद्रुप झाला,विषयमुक्त झाला.
ब्रम्हदेवाने शमदम जिंकला, वाऱ्यापेक्षाही वेगाने धावणाऱ्या मनाला काबुत आणले.त्याने चंचलता नाहिशी झाली.चित्तामध्ये विषयाचे चिंतन थांबले.आणि चैतन्य निर्माण झाले असे ब्रम्हदेवाच्या तपाचे वर्णन श्रीव्यासांनी केले आहे.
सज्जनहो देवांनाही देवपण प्राप्त करण्यासाठी कष्ट घ्यावे लागले आहेत. त्यांनाही कामक्रोधाने नक्कीच ताप दिलेला आहे.आपण प्रयत्न न करता यावर विजय मिळवुच शकत नाही. त्यासाठी नित्य प्रयत्न करावे लागतील.मन चैतन्यमय झालं की हे जग नव्यानं अनुभवता येईल.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/3slnlB9

Leave a Comment

error: Content is protected !!