कान्हुर पठार पतसंस्था कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ !

Table of Contents

पारनेर : राज्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या कान्हुर पठार पतसंस्था कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ दिली असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा सुशिला ठुबे यांनी दिली.
संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.यावेळी कार्यकारी संचालक गोपाळ ठुबे,सहकार्यकारी संचालक नमिता ठुबे,उपाध्यक्ष पी.के.ठुबे संचालक सुभाष नवले,राजेंद्र व्यवहारे,पो.मा.झावरे,संपत खरमाळे,भोमा ठुबे,गवराम गाडगे,भास्कर ठुबे,भगवान वाळुंज,सुहास शेळके,राजेंद्र रोकडे,मंगेश गागरे,दादाभाऊ नवले,मधुकर साळवे उपस्थित होते.
श्रीमती ठुबे म्हणाल्या,संस्थेची प्रगती साधत असताना संस्थेच्या वाढीस सभासद,हितचिंतक,ठेवीदार,
संचालक मंडळ यांच्या बरोबरच कर्मचाऱ्यांचेही मोलाचे योगदान असते.स्व.दिलीपराव ठुबे यांनी जी आर्थिक शिस्त संस्थेला घालून दिली ती पुढे नेण्याचे काम कर्मचाऱ्यांसमवेत संचालक मंडळ पुढे नेत आहोत.
संस्थेकडे ४२५ कोटी रूपयांच्या ठेवी असुन विविध शाखांमधुन २९० कोटी रूपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे.विविध बँकामध्ये १८८ कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

from https://ift.tt/jGJ9NEr

Leave a Comment

error: Content is protected !!