कतरिना आणि विकीची जोडी गड जेजुरीवर ?

Table of Contents

मुंबई : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. काही जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत या नवदांप्त्याने लग्नगाठ बांधली आहे. 9 डिसेंबर रोजी दोघांनी सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवरा येथे लग्न केलं.
ब्रायडल लूकमध्ये कतरिनाच्या चेहऱ्यावर एक वेगळाचं आनंद होता. लाल लेहेंगा, केसात गजरा, हातात बांगड्या आणि कपाळावर सजलेली टिकली यासर्व नववधूच्या साजाने कतरिनाच्या सौंदर्यात भर पडली.
जयपूरमध्ये लग्न पार पडल्यानंतर दोघेही लगेचच प्राईवेट हेलिकॉप्टरने जयपूरवरुन निघाले. यावेळी या हेलिकॉप्टरमध्ये विकी आणि कतरिना दोघेच निघाल्याचं दिसून आले. विकीची फॅमिली देखील नुकतीच जयपूर विमानतळावरून परत येताना दिसली. विकी आणि कतरिना येथून हनीमूनला रवाना झाल्याचे बोलले जात होते.
पण आता एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात विकी आणि कतरिना जेजुरी गडावर जात असल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये विकीने कतरिनाला उचलून घेतलं आहे आणि ते गड चढताना दिसत आहेत.
लग्नानंतर जेजुरीच्या दर्शनाला ही जोडी पोहोचली आहे. विकी आणि कतरिनाच्या लग्नाची घोषणा झाल्यापासूनच अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. त्यात लग्नानंतर दोघे कुठे जाणार याबाबत सगळ्यांना उत्सुकता असताना हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. एडिट करुन हा फोटो तयार करण्यात आला आहे. हा ओरिजनल फोटो एक वेगळ्या जोडप्याचा आहे.
दोघेही लग्नानंतर हनीमूनला मालदीवला रवाना झाल्याची चर्चा आहे. पण अद्याप कोणतेही फोटो समोर आलेले नाही.

from https://ift.tt/31OCtfs

Leave a Comment

error: Content is protected !!