ओबीसी आरक्षण संपविण्याचा भाजपाचा प्रयत्न !

Table of Contents

मुंबई : कोर्ट कचेरीच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण संपविण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे, असल्याचा आरोप राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी बोलताना केला. 
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून एकीकडे महाविकास आघाडी सरकारवर भाजपाकडून टीका होत आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात छगन भुजबळ बोलत होते. शरद पवार यांनी राज्यात मंडल आयोग लागू करण्याची घोषणा केली होती. त्यावेळीसुद्धा भाजपाने याला विरोध केला होता. आताही भाजपाकडून विरोध करण्याचे काम केले जात असल्याचेही भुजबळ म्हणाले.
भाजपाच्या कृतीत व विचारात फरक आहे, असे सांगत भुजबळ म्हणाले की,आरक्षण वाचविण्यासाठी आम्ही लढत आहोत. ज्यांनी आरक्षणाला विरोध केला, त्यांना दारात उभे करू नका, अशी माझी नागरिकांना विनंती असल्याचेही त्यांनी सांगितले.

from https://ift.tt/3GBkk3s

Leave a Comment

error: Content is protected !!