पारनेर: तालुका प्राथमिक शिक्षक परिषद आणि गुरुमाऊली मंडळ यांनी ऑलिंपिकचे स्वप्न पाहणाऱ्या अळकुटी येथील अत्यंत गरीब भंडारी कुटुंबातील तीन भगिनींना केलेली मदत अत्यंत प्रेरणादायी असुन शिक्षक परिषद गुरुमाऊली मंडळाने केलेल्या मदतीमुळे या गरीब कुटुंबातील मुली निश्चितच भविष्यामध्ये पी. टी. उषा होतील, अशी अपेक्षा अहमदनगर जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी व्यक्त केली.
अळकुटी येथे भंडारी कुटुंबातील तीन भगिनींना आर्थिक मदत वितरण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून श्री. पाटील बोलत होते.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्यनेते रावसाहेब रोहोकले, पारनेर तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे हे उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी भास्कर पाटील ह्या प्रसंगी म्हणाले की, शिक्षक परिषदेने राबवलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दल प्राथमिक शिक्षण विभाग शिक्षकांबद्दल समाजामध्ये एक सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत होत आहे. भंडारी भगिनींना आर्थिक मदत करण्याच्या दृष्टिकोनातून संघटनेच्या माध्यमातून एक लाख एकवीस हजार पाचशे एक रुपये निधी संकलन करून त्याचे वितरण अळकुटी येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन चेकद्वारे केल्याचा आनंद आहे.
यावेळी बोलताना रावसाहेब रोहोकले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षक परिषदेने आत्तापर्यंत राबवलेल्या विविध समाजोपयोगी कामांमुळे शिक्षक संघटना नावारुपास आली असून कोकण पूरग्रस्तांना केलेल्या मदतीमुळे त्यावेळी देखील पूरग्रस्तांच्या अश्रू पुसण्याचे काम संघटनेने केले. त्याप्रमाणे आज या मुलींना त्यांच्या पंखामध्ये बळ भरण्यासाठी जी मदत केली आहे ती अद्वितीय आहे.
यावेळी तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी संघटनेने राबविलेले एक झाड आठवणीचे या उपक्रमाचे आठवण करून दिली व तालुक्यातील प्राथमिक शिक्षक आपले शैक्षणिक योगदान देत असताना समाजासाठी सुद्धा योगदान देत आहेत. ही निश्चित गौरवास्पद बाब आहे असे प्रतिपादन केले.

भंडारी कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हालाखीची असून या मुलींना समाजातून पुढे येऊन मदत करणे अपेक्षित आहे, असे या मुलींचे गुरु आवारी सर यांनी सांगितले.
यावेळी कुमारी शितलने बोलताना प्रेरणादायी यशोगाथा विशद केली व निश्‍चितपणे आम्ही आपणा सर्वांच्या बळावर आंतरराष्ट्रीय मेडल जिंकल्याशिवाय राहणार नाही, असे सांगितले.
शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे ऋण व्यक्त करून या मुलींसाठी केबल दोन दिवसांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून तालुक्यातील व जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी चे भरीव योगदान दिले त्याबद्दल सर्व शिक्षकांचे आभार मानून भविष्यामध्ये देखील अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषद आणि गुरुमाऊली मंडळ सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर राहील असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष सुनील दुधाडे यांनी केले. आभार पारनेर तालुका गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब धरम यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप सुंबे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विकास मंडळाचे विश्वस्त भाऊसाहेब ढोकरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब रोहोकले, नगर तालुका शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष संजय दळवी, संगमनेर तालुका गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष संतोष भोर, जिल्हा कार्यालयीन चिटणीस गणेश वाघ, जिल्हा प्रतिनिधी बाबुराव कदम, पारनेर तालुका गुरुमाऊली मंडळाचे सरचिटणीस अशोक गाडगे, जिल्हा प्रतिनिधी के.डी. शिरोळे, तुकाराम एरंडे, महिला आघाडीच्या प्रमुख स्वाती झावरे, शिक्षक परिषदेचे पारनेर तालुका सरचिटणीस शिवाजी कोरडे आदींसह पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

from https://ift.tt/QWq7reL8a

By News

Leave a Reply

Your email address will not be published.