
सर्वच टेलिकॉम कंपन्या एक महिन्याच्या रिचार्जच्या नावावर ग्राहकांना 30 ऐवजी 28 दिवसांची वैधता देतात. तसेच दोन महिन्यांच्या रिचार्जमध्ये 54 अथवा 56 दिवसांची तर तीन महिन्यांच्या रिचार्जमध्ये 90 दिवसांऐवजी 84 दिवसांची वैधता दिली जाते. मात्र, असे करण्यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का? चला, तर याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊया…
टेलिकॉम कंपन्या एक महिन्याच्या रिचार्जमध्ये 28 दिवसांची वैधता ऑफर करतात. कारण यात त्यांचा मोठा फायदा आहे. यामुळे ग्राहकांना वाटते की, वर्षभरात आपण 12 च रिचार्ज करतो. मात्र, खरे तर 28 दिवसांच्या वैधतेनुसार वर्षभरात 12 नव्हे तर 13 महिन्यांचा रिचार्ज केला जातो. कारण, दरमहिन्याला दोन दिवसांची कमी वैधता असल्याने त्याची बेरीज केली असता शेवटी 28 दिवस बाकी राहतात.
फक्त फेब्रुवारी सोडल्यास 22 दिवस अतिरिक्त बाकी राहतात. 31 दिवसांचा महिना असल्यास 3 दिवस अतिरिक्त वाचतात. त्यामुळे अतिरिक्त दिवसांची संख्या 28 आणि 29 दिवस होते. त्यामुळे ग्राहकांना 13 महिने रिचार्ज करावा लागतो.
from https://ift.tt/3pMm4zV