
आज ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’. या पार्श्वभूमीवर आपण ग्राहकांचे मुख्य अधिकार, या दिनामागची उद्दिष्टे काय? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात…
● आजच्याच दिवशी 1986 साली ग्राहक संरक्षण कायदा तयार करण्यात आला होता.
● सन 1991 आणि 1993मध्ये यात सुधारणा करण्यात आली.
● याचा जास्तीत-जास्त वापर केला जावा म्हणून डिसेंबर 2002मध्ये पुन्हा या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली.
● यानंतर 15 मार्च 2003पासून या कायद्याच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली.
● या कायद्यात सुद्धा 1987मध्ये सुधारणा करण्यात आली होती.
● परंतु, 5 मार्च 2004 रोजी याची संपूर्ण अधिसूचना देण्यात आली.
● 2000मध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला.
ग्राहकांचे मुख्य अधिकार आहेत तरी काय? : सुरक्षिततेचा अधिकार, माहितीचा अधिकार, निवड करण्याचा अधिकार, समस्या निराकरण करण्याचा अधिकार, ग्राहक शिक्षणाचा अधिकार.
राज्यघटनेने आपल्याला ग्राहक म्हणूनही काही अधिकार दिले आहेत. त्यातील पहिला आणि सर्वात मोठा हक्क म्हणजे ग्राहकांना दिलेल्या किंमतीच्या समान वस्तू त्यांना मिळाली पाहिजे. तसेच ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी ग्राहक संरक्षण कायदा बनविला गेलाय. या कायद्यानुसार आता कोणताही ग्राहक अनुचित व्यापाराची तक्रार करू शकतो.
from https://ift.tt/3poHIeP