
सिंधुदुर्ग : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना टोला लगावला आहे. ज्यांच्या नेतृत्वाखालील बँकेत सतीश सावंत काम करत होते ते काय काय काम सांगत होते हे जिल्ह्याला माहित आहे. संस्था उभ्या करायला डोके आणि अक्कल लागते, पण बंद करायला अक्कल लागत नाही, असे म्हणत अजित पवारांनी नारायण राणेंना टोला लगावला आहे.
सहकार समृद्धी पॅनेलच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत हे नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. यावेळी बोलताना अजित पवारांनी राणेंवर बोचरी टीका केली आहे.शिवराम भाऊ, डी.बी.ढोलम यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. सहकारात पक्षीय राजकारण असता कामा नये. बँक ही प्रत्येक जिल्ह्याची अर्थिक नाडी असते, असेही अजित पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक राज्यात अग्रेसर आहे असून येथे मोठी स्पर्धा असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच विरोधकांचे राजकीय पाठबळ कसे आहे ते पाहा. दादागिरी दहशतीला घाबरू नका, असे म्हणत अजित पवारांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली.योग्य व्यक्तीच्या हातात बँक द्या. अन्यथा उस्मानाबाद, नांदेड, बीडसारखी अवस्था सिंधुदुर्ग बँकेचीही होईल. तसेच गाफिल राहु नका, असे आवाहन देखील अजित पवारांनी केले आहे.केंद्र सरकारची राज्यातील सहकार खात्यावर वक्रदृष्टी आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आदर्श घेऊन सहकारमध्ये काम केले पाहिजे, असे मत विनायक राऊत यांनी व्यक्त केले. कुठल्याही परिस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा बँक जिंकायची आहे, असेही विनायक राऊत म्हणाले.शिवराम भाऊंनी केलेले काम प्रत्येकाच्या स्मरणात राहिल. बँकेवर महाविकास आघाडीचेच पॅनेल येईल याचा मला विश्वास आहे, असे सतेज पाटील यावेळी म्हणाले.
from https://ift.tt/3EuPisK