सध्याचा काळ पहाता उद्या काय होणार? याची चिंता वाटावी असेच नित्य घडत आहे. जागतिक स्तरावर मोठी उलथापालथ होत आहे. जगणं संकटात जात आहे. निसर्गचक्र वेगाने अनियमितता धारण करीत आहे.भविष्य नावाची गोष्ट किती फुटकळ आहे!हे आता प्रकर्षाने जाणवत आहे.
अशा स्थितीत आपली मनस्थिती काय आहे? यावरच उद्या काय होणार,ही चिंता आपण सहज करतो की ती सतावत रहाते हे ठरणार आहे. त्यावरच आपण किती काळ चांगलं जगणार हे ही ठरणार आहे.भूत भविष्य कळों यावें वर्तमान।
हें तों भाग्यहीन त्याची जोडी।।
आम्ही विष्णुदासी देव घ्यावा चित्ते। होणार ते होते प्रारब्धेंची ।।
तुकोबाराय म्हणतात, भविष्य जाणण्याची गरजच नाही.भूतकाळाचे ज्ञान,वर्तमानात काय होईल आणि भविष्य काळाबद्दल जाणण्याची उत्सुकता प्रत्येक मनुष्याला असतेच. त्या गोष्टी जाणून घेणे हा बुद्धीहिन, भाग्यहिनांच्या दृष्टीने लाभ होय. विष्णूदासांनी मात्र मनामध्ये देवाचेच ध्यान करायचे असते.
प्रारब्धात जे घडायचे ते घडणारच आहे त्याची व्यर्थ चिंता करु नये.पण विष्णुदास होणं आधी जमलं पाहिजे.विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। ही तुकोबारायांची वैष्णव संकल्पना आहे.ती समजली की उद्याची चिंता रहात नाही.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/3G8OP0s

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *