“उद्धव ठाकरे पंतप्रधान होणारच!”

 

Table of Contents

मुंबई : दादरा नगर हवेलीत झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर मोठ्या मताने विजयी झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर हा विजय म्हणजे उद्धव ठाकरेंचे हे पंतप्रधान बनण्याच्या वाटेतील मोठे पाऊल असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
उद्धव ठाकरेंचा हातात हात घेतलेला फोटो पोस्ट करत महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेनेचे पहिले पाऊल. उद्धव ठाकरेंचे हे पंतप्रधान बनण्याच्या वाटेतील मोठे पाऊल आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यासोबतच त्यांनी #Chalodelhi हा हॅशटॅग वापरला आहे.
दरम्यान, लाबेन डेलकर, भाजपचे महेश गावित आणि काँग्रेसचे महेश धोदी यांच्यात तिरंगी लढत झाली. कलाबेन डेलकर यांना 1 लाख 16 हजार 834 तर भाजपच्या महेश गावित यांना 66 हजार 157 मते मिळाली आहेत. कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या उमेदवाराचा 50 हजार 677 मतांनी पराभव करत दादरा नगर हवेलीवर शिवसेनेचा भगवा फडकवला.

from Parner Darshan https://ift.tt/3mG7Nob

Leave a Comment

error: Content is protected !!