
बारामती : मी कोरोनाची लस घेतली नाही आणि घेणारही नाही, असे वक्तव्य निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
घोटी येथे कार्यक्रमात बोलताना इंदोरीकर महाराज यांनी कोरोना परिस्थिती व लसीबाबत खळबळ उडवून देणारे वक्तव्य केले आहे. राजेश टोपे यांनी इंदोरीकर यांच्या वक्तव्याबाबत त्यांची समजूत काढणार असल्याचे सांगितले आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलताना कोरोनाच्या लसीकरणाबद्दल माहिती दिली. तसेच इंदोरीकर महाराज यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.
इंदोरीकर महाराज यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये केलेल्या प्रबोधनातून समाजामध्ये जागृती होते. त्यामुळे त्यांच्या किर्तनाला मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. गेल्या दोन वर्षांपासून कीर्तन आणि प्रबोधन बंद असताना त्यांचा समाजातील जास्त संपर्क आला नाही. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली नसावी. जागतिक स्तरावर लसीकरणाचे महत्त्व सगळ्यांनी जाणलेले आहे. महाराजांचा अध्यात्मिक अभ्यास जास्त आहे. मात्र,वैज्ञानिक बाजू देखील समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
from Parner Darshan https://ift.tt/3BEbcIp