
नाशिक : राज्य आणि केंद्र सरकारकडून कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे वारंवार आवाहन करण्यात येतेय परंतु, प्रसिद्ध प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी कोरोना लसीबाबत एक अजबच वक्तव्य केले आहे. नाशिक जिल्ह्यातील घोटीमध्ये इंदोरीकर महाराजांनी हे वक्तव्य केले आहे.
लोकनेते गोपाळरावजी गोडवे यांच्या जयंतीच्या निमित्ताने इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. मी दिवसभर फिरतो, काय होईन, मी लस बिस घेतली नाही आणि घेणार पण नाही, असे वक्तव्य इंदोरीकर महाराज यांनी केले आहे. काय होतच नाही तर घेऊन करायच काय?,असा प्रश्न त्यांनी कीर्तनात केला आहे. कोरोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा, असा सल्ला इंदोरीकर महाराज यांनी कीर्तनात दिला आहे. वारकऱ्यांनी जरा जाग्यावर या, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
वारकऱ्यांनी एकाच झेंड्याखाली जगायला शिका. याला त्याला नाव ठेवण्याचे कामे बंद करा. आळंदीमधील हजार मुलं कंपनीत कामाला गेले. किती तरी चांगले पखवाज वादक कदाचित बोट घालून बसले महाराज, असे इंदोरीकरांनी म्हटले आहे.
उपजिविका करणे म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. त्याचा जीव गेला असता तर तो परवडला असता, पण त्याचं बोट गेल्यावर आयुष्याचं साधन राहत संपतं, असं इंदोरीकर महाराज यांनी कीर्तनात म्हटले आहे.
तुम्हाला फुकट तांदुळ मिळायचे, तुम्हा विकून टाकले पण आम्हाला दिले नाही. मी नावासकटं सांगेन आपलं काम वेगळ आहे. दुकान दाराने पॉलिस करून पुन्हा 40 रूपयाने विकले. ज्यांनी धर्म टीकवला आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं आहे, असं वक्तव्य त्यांनी केले आहे.
धर्म कोणामुळे आहे, कथाकार आहेत, रामायणकार आहेत, भागवतकार आहेत. वारकरी सांप्रदायाचं तत्वज्ञान आहे तोपर्यंत धर्म आहे, अशा शब्दात इंदोरीकर महाराजांनी वारकरी सांप्रदायाचा गौरव केला आहे. ज्यांनी धर्म टीकवला त्यांची वाट लावून टाकली असेही इंदोरीकर महाराजांनी म्हटले आहे.आपल्या धर्मातील देवांची आणि संतांची नावे टपऱ्यांना नसावीत ही विनंती. धर्मावर बोलायला निवृत्ती महाराज वक्ते यांच्यानंतर कोणी बोलले नाही, असे इंदोरीकर महाराज म्हणाले.
मोबाईल वाल्यांनी आणि क्लिपा वाल्यांनी धर्माची वाक्ये सुद्धा स्टेजवर बोलायला बंदी आणली आहे, असे वक्तव्य इंदोरीकरांनी केले आहे. तसेच मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करणाऱ्यांना खालची भाषा वापरली आहे.एकंदरीत कीर्तनात निवृत्ती महाराज देशमुख यांनी संमिश्र भाषा वापरली आहे. कधी मुख्य मुद्यावर तर कधी खालच्या स्तराची भाषा वापरली आहे. यावेळी त्यांनी युट्युबवर कीर्तन अपलोड करणाऱ्यावरही टीका केली आहे. युट्युबला दाखवताना ओव्या आणि प्रमाण काढून टाकतात. नको ती क्लिप दाखवतात, असेही इंदोरीकर म्हणाले.
एकंदरीत कीर्तनात निवृत्ती महाराज देशमुख यांनी संमिश्र भाषा वापरली आहे. कधी मुख्य मुद्यावर तर कधी खालच्या स्तराची भाषा वापरली आहे. यावेळी त्यांनी युट्युबवर कीर्तन अपलोड करणाऱ्यावरही टीका केली आहे. युट्युबला दाखवताना ओव्या आणि प्रमाण काढून टाकतात. नको ती क्लिप दाखवतात, असेही इंदोरीकर म्हणाले. दरम्यान, मी कीर्तनाच्या क्लिपचे सर्वात जास्त दु:ख भोगलय.अजुनही भोगतोय. मला दररोज कीर्तनाच्या क्लिपचा वाद असतो, असा दिवसचं जात नाही की, वाद नसतो. यावेळी त्यांनी राजकारण्यांना सल्ला दिला आहे. तुम्ही माणसांनी बोलताना समोरच्या माणसाचा मोबाईल बंद असेल तरचं काही बोला. तुम्हाला सुद्धा क्लिप घातक आहे. हे मी तुमच्यातला म्हणून सांगतो, हा विनोद नाही, असेही इंदोरीकर महाराज म्हणाले.
from Parner Darshan https://ift.tt/31lEU8B