
सोलापूर : मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरूनं सैराट या चित्रपटांमधून रसिक प्रेक्षकांच मन जिंकलं. रिंकूनं सैराट चित्रपटांमधून आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांवर आनोखी छाप पाडली. तसेच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते.
रिंकू राजगुरुनं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या या सुंदर फोटोमुळे सोशल मीडियावर ती भलतीच चर्चेत आली आहे. शेअर केलेला फोटोमध्ये रिंकूनं गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. तर साडी नेसल्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी तिला तुझे लग्न ठरले का ? असं विचारलं आहे.
शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होत आहेत. रिंकूनं नेसलेली गुलाबी रंगाची साडी काठपदराची असून, केसांची वेणी घातली आहे. केसात गजरा माळला आहे, तसेच कपाळावर तिने सुंदर अशी बिंदी देखील लावली आहे. रिंकूचा हा लूक एकदम मराठमोळा दिसत असून, अनेक चाहत्यांनी तिला लग्नाबद्दल प्रश्न विचारले आहेत.
तर चक्क एका युजरने कमेंटमध्ये, ठरलं की काय ? तर दुसऱ्या युजरने, लग्न ? असं लिहिलं आहे. तर आणखी एका नेटकऱ्यांनं, “लय भारी” अशी कमेंट केली आहे.
दरम्यान, रिंकूच्या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. तिचे फोटोवर कमेंट्सचा भरपूर वर्षाव होताना दिसत आहे. अनेक नेटकऱ्यांनी तिच्या फोटोला कमेंट करून प्रेम व्यक्त केला आहे. जवळपास या फोटोला 22हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच लवकरच ती आता नागराज मंजुळे दिग्दर्शित हिंदी चित्रपट ‘झुंड’मध्ये दिसणार आहे.
from https://ift.tt/3FcKkBN