
मुंबई : राज्यात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत शिवसेनाच दादा असल्याचे सांगत म्हणत आम्ही जर तुमच्या घरात घुसलो तर नागपुरात जाणं मुश्किल होईल असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.
भाजपाचे नेते वारंवार मला अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत जावं लागेल असं सांगत आहेत. तुमची इच्छा असेल तर कोठडीत जाऊ, पण लक्षात ठेवा आमच्या पाठोपाठ त्याच कोठडीत तुम्हालादेखील यावे लागणार आहे असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
सरकार पाडण्यासाठी आलेली ऑफर नाकारल्याने ईडी मार्फत कुटुंबीय आणि निकटवर्तीयांवर कारवाई सुरू झाली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, हे पत्र माहितीसाठी ट्रेलर अजून बाकी आहे, असं राऊतांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. भाजपच्या अनेक नेत्यांच्या नावे मोठमोठे घोटाळे आहेत. केंद्र सरकारमुळे आणीबाणीपेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. असे राऊतांनी म्हटले आहे.
from https://ift.tt/UfWVzRi