आमदार लंके म्हणाले,धडपड्या कार्यकर्त्यांची समाजाला खरी गरज !

Table of Contents

पारनेर :आजच्या समाजाला समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या तरुणांची आवश्यकता आहे.त्यामुळे सामाजिक भावनेतून कार्य करून तरुणांनी समाजाच्या ऋणातून उतराई होण्याचा जरूर प्रयत्न करावा त्यामुळे गावागावात समाजाप्रती खरी कळकळ असणारा राजू रोकडे सारख्या धडपड्या कार्यकर्त्यांची खरी गरज असल्याचे गौरवोद्गार आमदार निलेश लंके यांनी खडकवाडी येथे बोलताना केले.
वाढदिवसाच्या निमित्ताने आदिवासी बांधवांना जातीचे दाखले उपलब्ध करून देणे तसेच आधार कार्ड दुरुस्ती व नवीन आधार कार्ड देणे यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आदिवासी बांधव खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजू रोकडे यांचा वाढदिवस दरवर्षी विविध विधायक उपक्रमांनी साजरा होतो याबद्दल आमदार निलेश लंके यांनी विशेष उल्लेख केला आणि डी.जे. व पार्ट्या ही आपली संस्कृती नसून समाज सेवा हेच आपले ब्रीद आहे असेही आमदार निलेश लंके यावेळी म्हणाले.
खडकवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि निलेश लंके प्रतिष्ठानचे सक्रिय सदस्य भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे तालुका प्रवक्ते राजेंद्र मधुकर रोकडे यांचा वाढदिवस खडकवाडी येथे नुकताच आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या प्रसंगी मारुती आग्रे, प्रकाश गाजरे,बाळासाहेब खिलारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी पत्रकार शरद झावरे ,रामभाऊ तराळ , अमोल उगले , सुभाष ढोकळे ,अमोल म्हस्के , डॉ आग्रे , श्रीरंग रोकडे , आत्माराम गागरे , बबन ढोकळे ,विश्वनाथ ढोकळे ,रवि ढोकळे , नितिन ढोकळे , प्रदिप ढोकळे , योगेश शिंदे , ललित गागरे , संजय शिंगोटे ,दिपक ढोकळे , सतिष हुलावळे ,आबा नवले ,विशाल गागरे , सागर रोकडे , सुधीर शिंगोटे ,संतोष बर्डे , विनायक सागर , किशोर नवले ,अक्षय शिंदे , तुळशिराम ढोकळे , सुभाष गागरे , धोंडिभाऊ शिंगोटे , आणि आमदार निलेश लंके प्रतिष्ठानचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब शिंगोटे यांनी केले तर राजेंद्र रोकडे यांनी आभार मानले.

from https://ift.tt/3pCrHRw

Leave a Comment

error: Content is protected !!