
पारनेर : भारतीय सेना दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांचे बुधवारी हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले. यामुळे संपूर्ण देशातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनीही के. के. रेंज विस्तारीकरण बैठकीत रावत यांच्या भेटीचा आलेला योग. त्यावेळी यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शन आणि आपुलकीने झालेली विचारपूस या आठवणींना उजाळा दिला आहे. त्या कायम स्मरणात राहतील अशा शब्दांमध्ये आ.लंके यांनी रावत यांना श्रद्धांजली वाहिली.
सैन्य दलाच्या के. के. रेंज सराव प्रकल्पाच्या विस्तारामुळे अहमदनगर जिल्ह्यातील २३ गावांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.या गावांमधील लोकसंख्या ही आदिवासीबहुल असून त्यांचे उपजीविका व सुरक्षेचे प्रश्न घेऊन देशाचे भूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संरक्षणमंत्री श्री.राजनाथ सिंह यांच्या सह जनरल बिपीन जी रावत साहेब यांची भेट घेतली होती.हे सर्व प्रश्न संरक्षणमंत्र्यांसमोर मांडून स्थानिकांच्या प्रश्नांची दखल घेण्याची तसेच के के रेंजच्या पुढील विस्तारीकरणास स्थगिती देण्याची आम्ही मागणी केली होती,संरक्षणमंत्र्यांनी के के रेंजसाठी अधिक भूसंपादन होणार नाही याची ग्वाही दिली होती.यावेळी रावत साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले होते असे आमदार निलेश लंके यांनी म्हटले आहे.
मिटिंग मध्ये माझा परिचय रावत साहेबांशी झाला एक मनमोकळे, अभ्यासू व्यक्तिमत्व मला दिसून आले.. लष्करातील सर्व माहितीचा अभ्यास असणारे एक चांगले अधिकारी हरपले, मिटिंग नंतर त्यांचे आणि माझे के.के. रेंज संबंधी संभाषण होत असे.काल अचानक ही बातमी कळाली, भारतीय सैन्यदलाचे प्रमुख जनरल बिपिनजी रावत यांच्या निधनाने भारतीय सैन्यदलाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.आठवणींच्या रूपात नेहमी स्मरणात राहील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
लष्करप्रमुख पदानंतर तिनही सैन्यदलांच्या प्रमुखांची, संरक्षणदल प्रमुख पदाची जबाबदारी यशस्वीपणे त्यांनी सांभाळली. संरक्षणदल प्रमुख म्हणून त्यांनी तिनही सैन्यदलांत सहकार्य व समन्वय वाढवण्याचं काम केलं. प्रदीर्घ लष्करी सेवेत असंख्य लढाया व मोहिमा यशस्वी केल्या.
युद्धात आघाडीवर राहून सैन्याचं नेतृत्वं केलं. सहकारी अधिकारी, जवानांचं मनोबल कायम उंच ठेवण्यासाठी प्रयत्नशील असं त्यांचं नेतृत्वं होतं.त्यांच्या व त्यांच्या पत्नी बरोबरच ११ जणांचे झालेले अपघाती निधन ही देशवासियांच्या मनाला चटका लावणारी व प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणणारी घटना आहे.त्यांच्या सर्वांच्या आत्म्यास शांती मिळो, अशा शब्दांमध्ये आमदार निलेश लंके यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
from https://ift.tt/3rRHf6E