पारनेर: स्व.साॅ.गुलाबराव शेळके यांच्या सहकाराचा वारसा पुढे नेण्याचे काम जिल्हा बँकेच्या माध्यमातून अॅड. उदय शेळके करत आहेत बाजार समितीच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम सभापती प्रशांत गायकवाड करत आहेत सहकार चळवळीत दोघांचेही काम आदर्शवत असल्याचे सांगत आगामी बाजार समितीच्या निवडणूकीत विरोधकांचे पानिपत करून बाजार समिती राष्ट्रवादीच्याच ताब्यात राहणार असल्याचा विश्वास आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला.
पारनेर येथे सेवा संस्था,मजुर संस्था,सहकारी संस्थेच्या पदधिका-यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी आमदार लंके बोलत होते.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड उदय शेळके, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर,संचालक सभापती प्रशांत गायकवाड,अशोक सावंत तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे,बाजार समितीचे संचालक शिवाजी बेलकर,संचालक सावकार बुचुडे,लहु थोरात,अण्णा बढे,प्रदिप सोमवंशी, बाबाजी भंडारी,बी.एन.भालेकर,विक्रम कळमकर, किसन रासकर, तालुका विकास अधिकारी इंद्रभान शेळके, सहाय्यक निबंधक गणेश औटी,डाॅ.आबासाहेब खोडदे उपस्थित होते.
उपनिबंधक दिग्विजय आहेर म्हणाले, गटसचिवांच्या मोठ्या प्रमाणावर समस्या असुन गावातील होतकरू संगणकीय ज्ञान असलेल्या तरूणांना प्राधान्य द्यावे.दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफी यादी बनविण्याचे काम चालू असुन लवकरच अंतीम यादी तयार केली जाईल.
यावेळी अ‍ॅड. शेळके यांनी पदाधिका-यांशी सेवा संस्थेच्या विविध प्रश्नावर चर्चा केली व ते मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.संचालक प्रशांत गायकवाड यांनी सहकार क्षेत्रात होणारे बदल व विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी मासिक बैठक घेण्यात येईल असे सांगितले.

 

यावेळी सोमनाथ वरखडे,दत्ता पतके ,बापुसाहेब चंदन,रा.या.औटी बबलु रोहकले,प्रदिप सोमवंशी, खंडु भाईक, राजेंद्र शिंदे, सरपंच राहुल झावरे, सखाराम औटी,भागुजी झावरे, जालिंदर वाबळे, भागाजी गावडे, अशोक ढवळे,प्रभाकर लाळगे अमोल रेपाळे, राजु पठारे, गोकुळ लोंढे उपस्थित होते.
सभापती प्रशांत गायकवाड यांनी बाजार समिती मध्ये उत्तम रित्या कारभार करून समितीचा नावलौकिक राज्यभर नेला येत्या निवडणुकीतही आम्ही सर्व एकसंघ राहुन बाजार समिती राष्ट्रवादी काँग्रेस च्या ताब्यात राहणार असल्याचा विश्वास आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला.

from Parner Darshan https://ift.tt/3n2KLYL

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *