पारनेर : महाराष्ट्र राज्यात दुष्काळी तालुका म्हणून जरी पारनेरची ओळख असली तरी या परिस्थितीने अनेक बुद्धिवंत हिरे या महाराष्ट्रासह देशाला दिलेले आहे. त्यामुळे पारनेर तालुका हा बुद्धिवंतांची खान असून त्याचा मला अभिमान असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी टाकळी ढोकेश्वर येथे व्यक्त केले. तर दुसरीकडे पारनेर तालुक्यातील या बुद्धिवंतांच्या विचारांना चालना देण्यासाठी निघोज, कान्हुर पठार या ठिकाणी एक कोटी रुपयाची अभ्यासिका उभारण्यात येणार असून त्याचा फायदा पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील मुला-मुलींना निश्चित होणार असल्याचे मत आमदार लंके यांनी व्यक्त केले.
बाजार समितीचे संचालक अशोक कटारिया,भागुजी दादा झावरे, कारभारी पोटघन मेजर,बाळासाहेब खिलारी, राजेंद्र चौधरी, अंकुश पायमोडे,सचिन पठारे ,दत्तात्रय निवडूंगे,मंगेश खिलारी ,भाऊसाहेब झावरे सर, बबनराव गांगड,डॉ.बाळासाहेब कावरे,डॉ. उदय बर्वे ,दौलत गांगड,भाऊसाहेब बाबासाहेब गांगड ,अभयसिंह नांगरे, चंद्रकांत ठुबे ,मंगेश गागरे, ठकाशेठ गागरे,राजेंद्र बांडे यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील रहिवाशी असलेले प्राथमिक शिक्षक अशोक गागरे यांची कन्या प्रगती अशोक गागरे ही सी.ए परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. प्रगती गागरे यांनी या अगदर सुद्धा अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळवले असून ग्रामीण भागातील मुलीने यश मिळवल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.चार्टर्ड अकाउंट या परीक्षेचा सन 2022 निकाल आज जाहीर झाला असुन त्यात पारनेर तालुक्यातुन टाकळीढोकेश्वर येथील कु. प्रगती अशोक गागरे ही चार्टर्ड अकाउंट परीक्षा 2022 प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. प्राथमिक शिक्षक अशोक गंगाराम गागरे व शिक्षिका सौ. मोहिनी अशोक गागरे यांची ती कन्या असून आमदार निलेश लंके यांनी तिच्या वर सत्कार करुन कौतुकाचि थाप टाकली आहे.

from https://ift.tt/82Lpa5T

By News

Leave a Reply

Your email address will not be published.