आधी संत ओळखले पाहिजे !

Table of Contents

संत सहवासाशिवाय भलं होणार नाही. त्याशिवाय खऱ्या सुखाची प्राप्ती होणार नाही हे चिंतन आपण कालच्या भागात केले.आज आपण संत लक्षणं काय आहेत? संत कसे ओळखावेत? यावर चिंतन करणार संत नामदेवराय म्हणतात,
संतांचें लक्षण ओळखावया खूण । जो दिसे उदासीन देहभावा ॥१॥
सतत अंतरीम प्रेमाचा जिव्हाळा । वाचे वसे चाळा रामकृष्ण ॥२॥

महाराज म्हणतात, संतलक्षण कसं ओळखावं?तर ज्यांच्या ठायी देहाविषयी उदासीन भाव निर्माण झाला आहे. कारण आपण सारे प्रापंचिक देहभावाने प्रपंच करतो.म्हणून शरीराकर्षण आहे. आणि त्यामुळे पंच विषय विकार आपोआप येतातच.
शब्द, स्पर्श, रुप,रस,गंध हे शरीर धर्माला विकाराकडे नेणारे साधन आहे. शरीर भेद संपला की विषय विकार नाहिसे होतात.संताजवळ प्रेमाचा जिव्हाळा आहे.मुखात रामकृष्ण जप आहे.
त्या संतांचे चरण देखिले मी दृष्टीं । जळती कल्प कोटी पापराशी ॥३॥
अशा संतांचं चरणदर्शन झालं तर कल्पकोटी पापांचं उच्चाटन होतं.संतांचा सहवास जीवनाचं सार्थक करणारा आहे.जीवन जगताना व्यापक दृष्टी लाभणे हितावह आहे.भेदाभेद किंवा देहभावाने जगण्याची वृत्ती लोप पावल्याने खऱ्या सुखाची प्राप्ती होते.भगवतदर्शनाची तयारी संतसहवासातुनच आहे,नव्हे नव्हे संतदर्शन हेच भगवतप्राप्तीचं ठिकाण आहे.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/3qm6Sde

Leave a Comment

error: Content is protected !!