पारनेर : तालुक्यातील सुपा येथील उद्योजक संतोष गायकवाड यांनी गेल्या ६ वर्षापासून समाजातील वंचित घटकांबरोबर दिवाळी साजरी करण्याची परंपरा जपली आहे. पारनेर तालुक्यातील वासुंदे व खडकवाडी येथील जवळपास दीडशे कुटुंबीयांना गुरुवारी दिवाळीच्या सणाला मिठाईचे वाटप करण्यात आले.
सुपा औद्योगिक वसाहतीत आपला उद्योग व्यवसाय सांभाळत उद्योजक संतोष गायकवाड सामाजिक उत्तरदायित्व स्विकारत सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा वासुंदे गावातील दुर्गम भागात असणाऱ्या ठाकरवाडीच्या आदिवासी महिला, मुले व बांधवांना मिठाईचे वाटप केले आहे. तर दुसरीकडे खडकवाडीच्या जांभुळवाडी येथे आदिवासी समाजातील मोलमजुरी करणाऱ्यांना मिठाईचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.

सुपा येथील ओंकार ग्रॅनाईट आणि टाईल्स व सहारा प्रतिष्ठानचे उद्योजक संतोष गायकवाड हे गेल्या सहा वर्षापासून आपली दिवाळी गोरगरीब आदिवासी व वंचितासमवेत साजरी करत असतात. त्यानुसार आज ( गुरुवारी) पारनेर तालुक्यातील वासुंदे येथील ठाकरवाडी ( शिक्री) व खडकवाडी येथील जांभूळवाडीच्या आदिवासी बांधवासोबत दिवाळी साजरी केली.
यावेळी उद्योजक संतोषशेठ गायकवाड यांच्यासह पारनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद झावरे, उपाध्यक्ष सनी सोनवणे, कार्यकारणी सदस्य पत्रकार भास्कर पोपळघट, पत्रकार सतीश ठुबे, जोगेश्वरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर वाबळे प्रविण दरेकर व माजी पंचायत समिती सदस्य धोंडीभाऊ मधे, नवनाथ केदा, बाळासाहेब मधे यांच्यासह आदिवासी बांधव उपस्थित होते.
यावेळी उपस्थित आदिवासी यांनी दिवाळीनिमित्त आम्हाला जी मिठाई भेट दिली आहे त्याबद्दल जांभुळवाडी येथील तरुणांनी फटाके फोडत कृतज्ञता व्यक्त केली आहे. तर या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे आबालवृद्धांच्या चेहऱ्यावरील हास्य दिसून येत होते.

from Parner Darshan https://ift.tt/3mKHzkx

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *