
वॉशिंग्टन : यंदाच्या वर्षातलं पहिलं आणि एकमेवर ‘खग्रास’ सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळणार असल्याची माहिती अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने जाहीर केले आहे.
परंतु, हे सूर्यग्रहण प्रत्यक्ष पाहण्यासाठी तुम्हाला बरेच दूर जावे लागणार आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार, हे पूर्ण सूर्यग्रहण ४ डिसेंबर रोजी अंटार्टिका खंडावर पाहता येणं शक्य असेल. याशिवाय सेंट हेलेना, साऊथ जॉर्जिया, फॉकलंड बेटे, चिली, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या ठिकाणाहूनही आंशिक सूर्यग्रहण पाहता येऊ शकेल. भारतात मात्र हे सूर्यग्रहण दिसणार नाही.
पृथ्वी आणि सूर्याच्या मधोमध चंद्र दाखल झाल्यावर सूर्यग्रहण पाहायला मिळतं. यामुळे पृथ्वीवर चंद्राची छाया पडलेली दिसून येते. यामुळे पृथ्वीवरच्या अनेक भागांत सूर्यकिरण पूर्णत: किंवा आंशिक स्वरुपात पोहचू शकत नाहीत.
तसेच पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एका सरळ रेषेत येतात तेव्हा खग्रास सूर्यग्रहण दिसून येतं. यंदा हे पूर्ण सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार, ४ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता सुरू होईल. दुपारी १.३० मिनिटांनी पूर्ण सूर्यग्रहण दिसू शकेल. अंटार्टिका खंडावर सूर्यग्रहणाचं उत्तम दृश्यं दिसू शकणार आहे.
कुठे आणि कधी पाहू शकाल?
भारतात हे सूर्यग्रहण पाहायला मिळणार नसलं तरी ऑनलाईन तुम्ही हे दृश्यं पाहू शकाल. अंटार्टिकाच्या ‘युनियन ग्लेशियर’हून नासाकडून या सूर्यग्रहणाचं थेट प्रक्षेपण होणार आहे. नासाची वेबसाईट (nasa.gov/live) आणि यूट्यूब चॅनलवर तुम्हाल हे सूर्यग्रहण पाहता येईल. भारतीय वेळेनुसार, ४ डिसेंबर रोजी दुपारी १२.०० वाजल्यापासून याचं प्रसारण सुरू होईल.
पुढचं सूर्यग्रहण कधी असेल
यापुढचं संपूर्ण सूर्यग्रहण ८ एप्रिल २०२४ रोजी पाहायला मिळेल. कॅनडा, मॅक्सिको, अमेरिकासहीत जगातील वेगवेगळ्या भागांत हे सूर्यग्रहण दिसू शकेल. उल्लेखनीय म्हणजे, युरोपत या संपूर्ण शतकात एकही सूर्यग्रहण दिसू शकणार नाही.
from https://ift.tt/3DqNfFk