मुंबई : सध्या राज्यात आगामी महापालिका निवडणुकीच वारे जोरात वाहू लागले आहे. अशातच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगर पालिकेची निवडणूक राज्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची निवडणूक मानली जाते. सर्वच राजकीय पक्षांनी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.
काँग्रेसने या निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी सुरू केली आहे. यासाठी कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी हे २८ डिसेंबरला मुंबईत दौऱ्यावर येत आहेत.परंतु, त्यांच्या दौऱ्याला राज्य सरकारने अजूनही परवानगी दिलेली नाही. यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
दि.२८ डिसेंबरला राहुल गांधींचा शिवाजी पार्कवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राहुल गांधीच्या शिवाजी पार्कवरील सभेला राज्य सरकारने अद्यापही प्रतिसाद दिला नाही.राहुल गांधी यांच्या शिवाजी पार्कवरील सभेला परवानगी मिळावी यासाठी काँग्रेसने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

या सभेच्या परवानगीसाठी काँग्रेसने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून या याचिकेवर मंगळवारी तातडीची सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने मुंबईतील सभेला परवानगी नाकारल्याने काँग्रेस नेते चांगलेच नाराज झालेत आणि त्यांनी आता थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.याआधी काँग्रेसकडून मुंबई महापालिका, नगरविकास खात्याकडे सभेच्या परवानगीसाठी 15 दिवसांपूर्वीच अर्ज केला होता. मात्र, अद्यापही त्याला प्रतिसाद दिला गेला नाही आणि आता राहुल गांधी यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप नाराज झाले आहेत. तसेच काँग्रेसकडून आता उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे.

from https://ift.tt/31USj8k

By News

Leave a Reply

Your email address will not be published.